ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने महिला व बाळांची आरोग्य तपासणी व औषधी वितरण 

सोनेगाव (पाटण) शिबिरात महिला व बालकांचा सहभाग 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील सोनेगाव (पाटण) महिला व बाळांसाठी आरोग्य तपासणी व औषधी वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सामाजिक संस्था आहे. रोटरीचा मुख्य उद्देश समाजातील ग्रामीण, कुपोषित, कमकुवत लोकापर्यंत पोहोचून त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे हा आहे. सोनेगाव हे चंद्रपूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असून चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासून ७० किलोमीटर दूर आहे. या ठिकाणी शासनाच्या आवश्यक त्या सेवा पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यांची नेहमीच चणचण असते. अशा गरजू लोकांची निवड करून रोटरी क्लब व्दारे औषधी वितरणची आवश्यकता असल्याचे मत प्रकल्प निर्देशक डॉ. आसावरी देवतळे यांनी व्यक्त् केले. अध्यक्ष अजय पालारपवार व त्यांच्या चमूने तात्काळ निर्णय घेत २२ जुलैला सोनेगाव येथे आरोग्य तपासणी व औषधी वितरण शिबीर घेण्यात आले. शिबीरात सोनेगाव व आजुबाजुच्या गावातील महिला व लहान-लहान मुले शिबीरात आरोग्य तपासणीसाठी आली होती.

सर्व रूग्णांना डॉ.आसावरी देवतळे व डॉ. सोनाली कपूर यांनी तपासणी करुन त्यांना प्रोटीन पावडर व आवश्यक औषधी रोटरी क्लब तर्फे उपलब्ध करून दिली. रोटरीतर्फे शिबीरात संजय उपगल्लावार, अर्चना पालारपवार उपस्थित होते असे संस्थेचे सचिव मिलींद बोडखे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये