ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील 1984.85 च्या कृषी पदवीधरांचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन दौलताबाद येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कर्मभूमी असलेल्या वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय येथून 1984 व 1985 मध्ये उत्तीर्ण झालेल्या कृषी पदवीधरांचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन 10 व 11 जानेवारी ला हॉटेल जे व्ही एस पार्क इन,दौलताबाद येथे मोठ्या उत्साहात पार पडले, या गेट टुगेदर मध्ये कृषी क्षेत्रातील समस्या,आधुनिक तंत्रज्ञान,सेंद्रिय शेती,सामाजिक, आर्थिक समस्या,अशा अनेक विषयावर चर्चा झाली.चर्चेत प्रत्येकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.काहींनी खुप छान माहिती दिली.विविध क्षेत्रातुन सेवानिवृत्त झालेले आणि शेती व्यवसायात असलेल्या कृषी पदवीधरांचे स्नेहसंमेलन गेल्या 4 वर्षांपासून दामोदर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे होत आहेत, यापूर्वी नाशिक, वरोरा, नागपूर येथे स्नेहसंमेलन पार पडले,दोन दिवसीय संमेलन मध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र घृणेश्वर मंदिर, जगप्रसिद्ध वेरुळ लेणी,दौलताबाद येथील ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन उपयुक्त माहिती घेतली.

या गेट टुगेदर मध्ये दामोदर राऊत, नागपूर, विनायक थिगले, जालना,निळकंठ घाटोळे, मिलिंद लाड,अनंत ब्राह्मणकर,अनिल होले,गणेश रामटेके,मुकुंद खोब्रागडे, देवराव वैरागडे,सर्व नागपूर, वसंत ताजने, राजेश्वर राजूरकर,अनिल मोरे,शांताराम बरबटकर,सर्व चंद्रपूर, अशोक डोईफोडे, बुलढाणा, नरेंद्र धरपाल, दीपक उतखेडे, प्रभाकर बेले, सर्व अमरावती,अनंत राऊत, गोपाल बोन्डे,गजानन डिके,सर्व अकोला,दिलीप शेळके,राहुरी, शांताराम चांदोरे,नाशिक,संजय पाटील, जळगाव, विजय मेहेत्रे,संभाजीनगर सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये