ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्याधर बन्सोड यांच्या ‘मोनास पत्रं’ ला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ऍग्रोवन न्यूज परिवार संस्थेने घेतली 'मोनास पत्रं' बालसाहित्याची दखल

चांदा ब्लास्ट

          ऍग्रोवन न्यूज परिवार फलटण जिल्हा. सातारा या संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. या संस्थेच्या वतीने चंद्रपुरातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड लिखित “मोनास पत्र” या बालसाहित्यास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.

             प्रा. डॉ. बन्सोड हे सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांची साहित्यिक वाटचाल ही गाव खेड्यातील वास्तवाचे दर्शन घडवून आणणारी आहे. बालसाहित्यासोबतच, कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित, समीक्षा तसेच वैचारिक लेखन करून त्यांची आतापर्यंत २२ पुस्तके प्रकाशित आहेत. व त्या पुस्तकांना ४० पेक्षा जास्त राज्यस्तरीय व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेले आहेत. मागील २७ वर्षात त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये समाजप्रबोधनपर व्याख्याने दिलेली आहेत. डॉ. बन्सोड यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्याचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश असून, त्यांच्या साहित्यावर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी पीएच. डी. करत आहेत. सरदार पटेल महाविद्यायात कार्यरत असलेले डॉ. बन्सोड हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले आहे. एकंदरीत सर्वच क्षेत्रात त्यांनी बहुमूल्य कार्य सुरू ठेवले आहे व यातच त्यांच्या साहित्याची दखल ही ऍग्रोवन न्यूज परिवार सारख्या नामांकित संस्थेने घ्यावी ही बाब चंद्रपूर वासियांसाठी अभिमानाची आहे असे मत जिल्ह्यातील अनेक कवी, साहित्यिकांकडून व्यक्त होत आहे.

     डॉ. बन्सोड लिखित ‘मोनास पत्र’ या बालसाहित्यास दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी फलटण जि. सातारा या ठिकाणी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी ७ व्या साहित्य संमेलनात हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. असे ॲग्रोवन न्यूज परिवार संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश सस्ते यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये