ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर

मेधा पाटकर यांना जीवनगौरव व सारंग बोबडे यांना सेवार्थ सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृप बिबीचे यंदाचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मुंबई येथील नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना व नव्या पिढीतील आश्वासक सामाजिक योगदानासाठी दिला जाणारा सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील देशपातळीवर कार्यरत ‘डोनेटकार्ट’चे संस्थापक सारंग बोबडे यांना जाहीर करण्यात आला आहे. बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर मागील ३८ वर्षांपासून निःशुल्क उपचार करत असून पाच लाखांहून अधिक अस्थिरुग्नांना बरे केले केले. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ २०१२ पासून दरवर्षी स्व.सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप व प्राचार्य डॉ.अनिल मुसळे यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येते. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मेधा पाटकर या सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून देश-विदेशात परिचित आहेत. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील वंचित, पिढीत सर्वसामान्य आदिवासींच्या न्याय व हक्कांसाठी त्या लढा देत असून ३७ हजार गावातील लोकांना अधिकार मिळवून देण्यात त्यांचे योगदान आहे. १६ वर्षे नर्मदा घाटीत घालवणा-या मेधा पाटकरांचे विश्व बॅकेसह अनेक जन आंदोलने देशाला दिशा देणारे ठरले आहेत. सारंग बोबडे यांनी फ्लिपकार्टच्या धर्तीवर ‘डोनेटकार्ट’ कंपनी सुरु करुन देशात सामाजिक कार्य व पिढीतांच्या सक्षमीकरणासाठी २५० कोटींहून अधिक रक्कम थेट मदत केली आहे. जागतिक स्तरावर फोर्ब्स यादीत तीस वयोगटाखालील प्रभावशील तरुण म्हणून दखल घेण्यात आली आहे.

यंदाचा दिव्यग्राम महोत्सव १४ नोव्हेंबरला बिबी येथे आयोजित असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपतर्फे आयोजक अविनाश पोईनकर, ॲड.दीपक चटप, संतोष उपरे, गणपत तुम्हाणे, विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, हबीब शेख, सतिश पाचभाई, विशाल अहिरकर, राजेश खनके, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, कार्तिक मोरे, सुरेंद्र मुसळे, शुभम डाखरे, सुरज लेडांगे, देवानंद पिंपळकर, सचिन आसूटकर, राजेंद्र सलाम, महेश नाकाडे, इराणा तुम्हाणे, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, आकाश चटपल्लीवार, गोपाल मडावी, गणपत मडकाम, सुरज मडावी, महेश राठोड यांनी कळवले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये