ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध असलेले उत्कृष्ट खेळाडू दिवंगत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, प्रा. सचिन कणॅवार,प्रा. बावणे, प्रा. मुसळे, प्रा. ठमके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल मुसळे यांनी मेजर ध्यानचंद हे केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होते. त्यांनी अनेक हॉकी स्पर्धांमध्ये बरीच पदके मिळवून दिली. 1936 च्या ओलंपिक सामन्यात भारताने हॉकी खेळात सुवर्णपदक मिळवले होते, त्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता असे मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका बावणे यांनी केले.

या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन कणॅवार यांनी केले. सदर कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागातील राणी कवठे, पल्लवी दोरशेटवार, श्रुती राऊत, अश्विनी पवार या स्वयंसेविकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, प्रशांत नवले, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, ननिता बुरान व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये