ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संताजी मंडळातर्फे दोन दिवसीय गरबा, दांडीया कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने समाज बांधवांकरीता दि.२३,२४ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय गरबा दांडीया महत्सवाचे आयोजन संताजी भवन येथे करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात डिजेच्या तालावर शेकडो महिला, मुलींनी गरबा दांडीया खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.

       समाज बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावे, याकरिता संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने (दि.२३,२४ सप्टेंबर) मंगळवार, बुधवार रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत संताजी भवन येथे गरबा दांडीया महत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला आरती आणि पूजा अर्चना करून कार्यक्रमाला सुरवात झाली. भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमात डिजेच्या तालावर शेकडो महिला, मुलींनी गरबा दांडीया खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत श्री संताजी मंडळाचे अध्यक्ष श्री.मंगेश बेले, उपाध्यक्ष सुधाकरराव घुबडे, सचिव राजेशजी खनके, कोषाध्यक्ष मोहनराव कळंबे, ज्ञानेश्वर कांबळी, मधुकरराव शेंडे, विजयराव बाबुलकर, चंद्रशेखर लिचोडे, जयंतराव सरकर, राजूभाऊ गवळी, किसनराव लोहबडे, पलाश कवलकर, प्रदीप लोखंडे, अविकांत नरड

सूरज कवलकर, मोनीश खनके,महिला अध्यक्षा प्रा. डॉ. भाग्यश्री रागीट, पिंकी खनके, सौ. स्मिता कवलकर, सौ.वैष्णवी जुमडे, श्रीमंती स्वाती बाभुळकर, सौ.रुपाली भलमे, सौ. नेहा सातपुते, युवती अध्यक्षा मोनाली बेले, कल्याणी पोहाणे, पूजा लोहबळे, समृध्दी शेंडे, तनुश्री कुकडकर, नंदिनी झाडे, गौरी खनके,हर्षदा नागपुरे यांची सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालक प्रा. डॉ. भाग्यश्री रागीट यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये