Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत बल्लारपूर नगर परिषदेचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

नगर विकास विभाग, चंद्रपूर जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा “उमंग 2025” चे आयोजन दिनांक 02, 03, 04 व 05 जोनवारी 2025 ला ब्रम्हपूरी येथे आयोजित करण्यात आले. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगरपंचायती, नगर परिषदा व चंद्रपूर शहर महानगरपालिकांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

बल्लारपूर नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मुख्याधिकारी विशाल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली व उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार यांचे नेतृत्वात जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक उत्तुंग यश मिळविले. त्यात कबड्डी (पुरुष) – प्रथम, क्रिकेट (पुरुष) – द्वितीय, उत्कृष्ट फलंदाज हर्षल आदे, उत्कृष्ट गोलंदाज – ओमप्रकाश कुळे, उत्कृष्ट कबड्डी रेडर – रोहित निकेसर, गोळाफेक (पुरुष) तृतीय शुभम काटेवार, कॅरम एकेरी प्रथम शिवा भैनवाल, बॅडमिंटन (महिला एकेरी) द्वितीय संगिता उमरे, बॅडमिंटन (महिला दुहेरी) द्वितीय संगिता उमरे व सुशिला पावडे, बॅडमिंटन (मिश्र दुहेरी) द्वितीय संगिता उमरे व नविन येनुरकर, गीत गायन (एकल) प्रथम संगिता उमरे, नृत्य (एकल) प्रथम – संगिता उमरे, समुह नृत्य तृतीय- संगिता उमरे व ग्रुप इत्यादीमध्ये यश मिळविले.

सदर स्पर्धेत बल्लारपूर नगर परिषदेकडून मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, उपमुख्याधिकारी संगिता उमरे, सुशिला पावडे, अक्षय राऊत, दिलीप वांढरे, दशरथ सातपुते, हर्षल आदे, अजय झांझोटे, कृष्णा गुल्हाणे, मयुर दहीकर, नरेश गेडाम, विजेंद्र सौदागर, रोहित निकेसर, नवीन येनुरकर, पप्पु ढेनवाल, ओमप्रकाश कुळे, शुभम काटेवार, बिनय दत्ता, बबलु धुर्वे, संजय निवलकर, निलेश वाढई, अब्दुल रशिद, शुभम रत्नपारखी, अमित कन्नाके, शिवा भैनवाल, सावन बरसे इत्यादींनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले. बल्लारपूर नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये