ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वधर्म समभाव एकतेचे प्रतीक रेल्वे दुर्गा मंडळ भांदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

धर्म, प्रांत, भाषा, यात मतभेद करून सामाजिक, राजकिय, धार्मिक दुकानदारी चालविणाऱ्या धर्मांध घटकाला सणसणीत चपराक देऊन एकता एकोपा राखणार व सर्वधर्म समभाव बाळगणारे स्थानिक रेल्वे दुर्गा मंडळ रेल्वे स्टेशन भांदक भद्रावतीकरांचा कौतूकाचा व अभिनंदनाचा विषय ठरलेला आहे.

सलग मागील सन 2019 म्हणजेच चार वर्षांपासून याही साली मोठ्या थाटामाटात व आकर्षक देखाव्यात व कल्पकतेने भक्तांना सुखावणाऱ्या सुबक, सुंदर दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. मूर्ती अत्यन्त विलोभनीय असून साक्षात माँ. दुर्गा आपल्या पुढ्यात जिवंत उभी असल्याचा साक्षात्कार होत असल्याची भाविकांची प्रतिक्रीया आहे.

माँ. दुर्गा उत्सवाच्या या यशस्वी आयोजनात अध्यक्ष सरवर अली सय्यद, सचीव बबलू डाफ तसेच किशोर ठाकरी, विजय ठाकरी, अमोल देठे, अक्षय परेकर, सलाम शेख, संतोष पारखी, रुपेश मडावी, बंटी यादव व इतर सर्व सदस्य मोलाची भूमिका पार पाडत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये