ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माऊंट सायन्स ज्युनियर कॉलेजचा हर्षद चरडूके राज्यस्तरीय कला महोत्सवात तिसरा

सर्व शिक्षक कर्मचारी हर्षदच्या यशाबद्दल अभिनंदन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

       पुणे येथे शुक्रवारी 24 नोव्हेंबर आयोजित राज्यस्तरीय कला महोत्सवात माऊंट सायन्स ज्युनियर कॉलेज, सावलीचा विद्यार्थी हर्षद प्रशांत चरडुके याने तिसरे पारितोषिक पटकावले.

     माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लपलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी देशभरात कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. मंगळवार 7 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बाबूपेठ, चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हास्तरीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात हर्षद प्रशांत चरडुके यांना प्रथम पारितोषिक मिळाले आणि त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

   23 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे येथे या महाराष्ट्र राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हर्षद प्रशांत चारडुके याने एकपात्री प्रयोग स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले. हर्षद चारडुके यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल रामटेके व सर्व शिक्षक कर्मचारी हर्षदच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये