ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर बनले ९ टि.बी. रुग्णांचे निःक्षय मित्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर सातत्याने सभोवतालच्या गावाच्या विकासाकडे लक्ष देत असते. ग्रामवासियांच्या आरोग्याला महत्त्व देत टि.बी.निर्मुलन करण्याकरिता जन सहभाग अभियान अंतर्गत सभोवतालील गावातील एकूण ९ क्षयरोग ग्रस्त लोकांना पौष्टीक आहार किट वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. स्वप्निल टेंभे, तालुका आरोग्य अधिकारी कोरपना, डॉ. बबीता नरूला-मुख्य वैद्यकीय अधिकारी, आवारपूर सिमेंट वर्कस्, डॉ. संकेत शेंडे-वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा, तसेच सौं. माधुरी टेकाम, सरपंच बीबी, श्री. अरुण रागीट- सरपंच पालगाव-बाखर्डी, श्री. पुरुषोत्तमजी आस्वले-उपसरपंच नांदा, श्री. रत्नाकर चटप- सदस्य, नांदा ग्रामपंचायत व सी.एस.आर. विभाग प्रमुख – प्रतीक वानखेडे उपस्थित होते.

डॉ. स्वप्नील टेंभे यांनी टि.बी. निर्मूलन बद्दल सर्वांना महत्वपूर्ण माहिती दिली व डॉ. बबीता नरुला यांनी आपल्या प्रेरणादायी शब्दानी रूग्णांनाचे मनोबल वाढवले. सर्व रूग्णांना दर माह त्यांच्या उपचार कालावधी प्रमाने पौष्टीक आहार किट दिल्या जाईल असे आश्वासन सी.एस.आर. विभागाचे प्रमुख प्रतीक वानखडे यांनी दिले. या कार्यक्रमाला यशस्वीतेकरिता संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये