ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंजुर घरकुलाचे बाकी असलेले अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना द्या 

युवा सेनाची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील मोदी आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाचे हप्ते बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, त्यामुळे लाभार्थी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे, तेव्हा लाभार्थ्यांच्या खात्यात राहिलेले हप्ते अदा करण्यात यावे, तसेच पंतप्रधान आवास रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेले घरकुलाचे आलेले उद्दिष्ट लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी देऊळगाव राजा तालुका युवासेनेचे समन्वयक दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केली आहे, अनुदान वाटप करण्यात आले नाही तर १५ दिवसानंतर युवा सेना च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, निवेदन देताना स्वप्नील शहाणे, संदीप तळेकर, भानुदास खांडेभराड, संतोष तळेकर, संजय डोंगरे, प्रकाश पाटोळे उपस्थित होते.

माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सुद्धा गट विकास अधिकाऱ्याना सुचित केले आहे की लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे तात्काळ अनुदान देण्यात यावे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये