Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक धर्मराज काळे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथील मुख्याध्यापक धर्मराज काळे यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनी राज्याचे शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानिमित्त शाळेतील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचा शाळेच्या सभागृहात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, सुरेश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक योनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माधुरी उमरे,जीवन आडे, प्रभाकर पुंजकर, शशीकांत चन्ने, यांनी सुद्धा मुख्याप‌क काळे यांच्या कार्याचा गुणगौरव केला.कार्यक्रमाचे संचालन नेष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी तर आभार सुषमा शेंडे यांनी मानले.कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वि‌द्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये