ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू पोलीसांनी विद्यार्थ्याचे वाचविले प्राण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 05.08.2026 रोजी सायंकाळी 7.00 वा. सुमारास पोलीस स्टेशन सक्करदरा, नागपूर शहर कडून पोलीस स्टेशन सेलू चे लॅन्डलाईन फोनवर माहिती मिळज्ञली की, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला विद्यार्थी हा सायंकाळी अंदाजे 5.30 वा. सुमारास त्याचे मोटार सायकलनी वर्धेकडे निघाला असून त्याने फोन द्वारे कोठेतरी आत्महत्या करतो, असे सांगीतले. सदरचे माहिती वरून पोलीस स्टेशन सेलू चे ठाणेदार पो.नि.श्री.पंकज वाघोडे, ठानेदार पो.स्टे. सेलू यांनी वरिष्ठ अधिका-यांचे मार्गदर्शनामध्ये तात्काळ पोलीस स्टेशन सेलू येथील स. फौ. जावेद धामीया पो.हवा. मंगेश राऊत, चालक पो.हवा. विनोद कोडापे, पो.स्टे. सेलू यांना देवून विद्यार्थ्याजवळ असलेले मोबाईल फोन चे प्राप्त लोकेशन ट्रेस करून पोलीस स्टॉफसह परिसरात शोध मोहिम सुरू केली, तसेच मिळालेले लोकेशन नुसार नागपूर ते वर्धा रोड वरील महाबळा बस स्टॉप ते कोटंबा फाटा दरम्यान रोडचे डावे बाजुला असलेले एका शेतामधील विहीरीमध्ये सदर विद्यार्थी याने उडी मारल्याचे पोलीसांनी निदर्शनास आल्याने पोलीसांनी तात्काळ त्यास महाबळा येथील पोहणारे व्यक्तीचे मदतीने विहीरीबाहेर सुखरूप काढून त्यास समुपदेशन करण्यात आले, व ग्रामीण रूग्णालय, सेलू येथे प्राथमिक उपचार केले, प्रकृती बरी असल्याने त्यास त्याचे नातेवाईकांचे ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल, (आय.पी.एस.) पोलीस अधिक्षक सा. वर्धा, मा.श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक सा. वर्धा, मा. श्री. सुनिल महाडिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलू येथील ठाणेदार श्री. पंकज वाघोडे, सहायक फौजदार जावेद धामीया पोलीस हवालदार मंगेश राऊत, चालक पो.हवा. विनोद कोडापे, पो.स्टे. सेलू यांनी केली आहे.

(पंकज वाघोडे)

ठाणेदार/स. पो. नि पोलीस स्टेशन, सेलू जिल्हा वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये