ताज्या घडामोडी

राजुरा पोलिसांची अवैध सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर मोठी कारवाई – एकाच दिवशी आवळल्या शहरातील चार विक्रेत्यांच्या मुसक्या

7,37,216/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा पोलिसांनी 27 जुन रोजी शहरात धडक कारवाई करून एकाचवेळी चार तंबाखू विक्रेत्यांच्या दुकान व गोदामावर धाडी घालुन माजा, बाबा 120, ईगल सह इतर कंपनीचा सुगंधी तंबाखू व विमल, सिग्नेचर सह काही कंपन्यांचा गुटखा व पान मसाला असा तब्बल 7,37,216/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तरुणाईला व्यसनाच्या खाईत लोटणाऱ्या अवैध सुगंधी तंबाखू व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

राजुरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील गडचांदुर मार्गावर खालिद हिदायतउल्ला खान हा व्यापारी महाराष्ट्र किराणा दुकानात प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू विक्री करीत असुन शहरात त्याचे इतर ठिकाणी गोदाम सुद्धा आहेत. या माहिती वरून त्याचे दुकान व गोदामाची पंचासमक्ष झडती घेतली असता 4 विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू व इतर सुगंधित तंबाखू व गुटखा असा छापील किंमतीनुसार एकूण 6,00,250 रूपयांचा प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू आढळून आल्याने मुद्देमाल ताब्यात घेतला. पुंडलिक रागीट यांचे लक्ष्मी किराणा दुकानात सुगंधित तंबाखू विक्री करीत आहे या माहिती वरून दुकाची झडती घेतली असता विविध कंपनीचे एकूण 34,490/- रू चा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

अशोक ठक्कर यांचे जय अंबे किराणा आणि गोडाऊन मध्ये सुगंधित तंबाखू विक्री व वितरणाकरिता साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली असल्याने झडती घेतली असता विविध कंपनीचे प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू छापील किंमत 101486/- मिळुन आला तसेच कर्नल चौक येथील मनीष पंजवाणी यांचे मनीष किराणा दुकानातून 1000 रू किमतीचा इगल प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू ताब्यात घेतला.

अवैध सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती कळताच इतर व्यापारी आपल्याकडील मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावतील अशी शक्यता गृहीत धरून राजुरा पोलिसांनी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक व ठाणेदार विशाल नागरगोजे व एलसीबी पथकाचे प्रमुख सपोनी जोशी ह्यांच्या नेतृत्वात एकाचवेळी सर्व दुकानांवर सुनियोजित धाड घालुन 7,37,216/-  (सात लाख सदतीस हजार दोनशे सोळा) रुपयांचा अवैध सुगंधी तंबाखू जप्त केला. ह्या यशस्वी कारवाईत पोउनि गेडाम, पोउनि हाके, पोउनि वडतकर, सहा. पोउनि टेकाम, पोहवा सचिन पडवे, पोहावा किशोर तुमराम, पोशी तिरुपती जाधव, भारत राठोड, महेश बोडलावार, अमोल ठावरी, संतोष पोले, रवी तुराणकर, योगेश पिदुरकर व चालक लक्ष्मण देशवेणी ह्यांनी चोख कामगिरी करून अवैध तंबाखू विक्रेत्यांवर जरब निर्माण केली आहे. पोलीस विभागाने सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता अन्न व औषध प्रशासन विभाग यांना धाडीची व जप्त मुद्देमालाची माहिती कळविली असुन पुढील कारवाई नियमानुसार संबंधित विभागाच्या तपासणीअंती करण्यात येणार असल्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक व ठाणेदार विशाल नागरगोजे व एलसीबी पथकाचे प्रमुख सपोनी जोशी ह्यांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये