Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

सौरभ बतकमवार ह्यांनी खोवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा – सेट परीक्षेत भौतिकशास्त्रात मारली बाजी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा येथिल काँग्रेस पक्षाचे नेते साईनाथ बतकमवार ह्यांचे सुपुत्र, प्रज्ञावंत विद्यार्थी सौरभ बतकमवार ह्यांनी प्राध्यापक पदासाठी पात्रतेचा निकष असलेल्या महारष्ट्र शासनाच्या सेट परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2023 रोजी सेट परीक्षेचे आयोजन केले होते. ह्या परीक्षेत सौरभने भौतिकशास्त्र विषय घेऊन परिक्षा दिली. 27 जुन रोजी जाहिर करण्यात आलेल्या निकालानुसार त्याने 150 गुण प्राप्त करून भविष्यातील विद्यार्थी घडविण्याच्या मार्ग मोकळा केला आहे.

सौरभने आपले शालेय शिक्षण शहरातील इन्फंट जिजस कॉन्व्हेन्ट मधुन पुर्ण केले, दहाव्या वर्गात 95% गुण घेऊन त्याने आपली चुणुक दाखवून दिली होती. उच्च माध्यमिक व पदवी अभ्यासक्रम शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातून तर भौतिक शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चंद्रपूर येथिल सरदार पटेल महाविद्यालयातून उत्तम गुणांनी पुर्ण केला असुन सध्या तो गोंडवाना विद्यापीठातून भौतिकशस्त्रातील आचार्य पदवी (PHD) पुर्ण करीत आहे.

भौतिक शास्त्रविषय घेऊन बऱ्याच कालावधीनंतर राजुरा तालुक्यातून सेट परीक्षा उत्तीर्ण करणारा विद्यार्थी ठरल्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशाबद्दल कौतुक करण्यासाठी व मनोगत जाणुन घेण्यासाठी चांदा ब्लास्ट ने संपर्क केलं असता त्याने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई वडील, आतापर्यंत मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकवृंद, नेहमीच प्रोत्साहन देणारा भाऊ, तसेच माजी सिनेट सदस्य असलेले काका अजय बतकमवार, व शिक्षिका असलेल्या काकूंना दिले असुन वडिलांचा समाजसेवेचा वारसा शिक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे नेणार असुन देशाच्या भावी पिढीला सुयोग्य मार्गदर्शन करून गरजु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा आपला मानस असल्याचे सौरभ बतकमवार ह्याने आवर्जुन सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये