ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे महासत्संग सोहळाचे आयोजन

विविध मान्यवरांचा आश्रमच्या वतीने सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गोसेवा केंद्र नंदप्पा/कोलांडी यांच्या वतीने गडचांदुर येथे महा सत्संग सोहळा चे आयोजन नुकतेच बालाजी सेलिब्रेशन, गडचांदूर येथे करण्यात आले, या कार्य क्रमात प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री शंकररावजी देवाळकर यांचा आश्रम कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला यांनी ध्यानाच्या माध्यमातून मानवी जीवन घडविण्यासाठी ध्यानाचे महत्त्व पटवून दिले तसेच भगवान नित्यानंद बाबा आणि प्रियानंद महाराज आणि समस्त गुरू शक्ती जागृतीतून आश्रमाची निर्मीती व भविष्यातील आश्रमाच्या सेवे विषयी माहिती दिली, मार्गदर्शक स्मिताताई अनिल चिताडे मुख्याध्यापिका (महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर)यांचा आश्रम कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला यांनी आपल्या भाषणातून स्त्री शक्ती जागृती, सामाजिक व शैक्षणिक तसेच आध्यामिक विषयावर मार्गदर्शन करताना जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर राक्षसानी हाहाकार माजविला तेव्हा देवी ने अवतार घेऊन राक्षसाचा वध केला त्याच प्रमाणे आज कलियुगात राक्षस कोणी व्यक्ती नसून ते माणसाच्या शरीरातील विकार आहेत हे उदाहरणातून पटवून दिले.

श्री बंडू भाऊ गेडाम (सामाजिक कार्यकर्ते)यांचा आश्रम कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला यांनी आपल्या भाषणातून आश्रमाशी जुळण्याचे योग शैक्षणिक शेती सामाजिक विषयावर तसेच आध्यात्मिक व आश्रमाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील तसेच भविष्यातील संस्थेच्या कार्य विषयी माहिती दिली ,श्रीॲड दीपक चटप (आंतरराष्ट्रीय चेव्हीनिग स्कॉलर गोल्ड वालटरीग पुरस्कार विजेता लंडन यांचा आश्रम कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला त्यांनी ग्रामीण भागातून छोट्या गावातून शिक्षण घेऊन जिद्दीने चिकाटीने लंडन पर्यंत चा प्रवास व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान सीमित असून आध्यात्म अनंता कडून अनंता कडे नेणार आहे हे आपल्या मार्गदर्शना तून सांगितले,त्यांनी आश्रमाला भेट देऊन ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याची घोषणा केली. डॉ.कुलभूषण मोरे यांचा आश्रम कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला त्यानीआपल्या मनोगतातून आश्रमात निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्याची घोषणा केली श्री डॉ.गिरिधर काळे (समाज सेवक)श्री प्रशांत भाऊ गोखरें, किशोरी गोखरे मॅडम,श्री बालाजी पुरी,श्री पूनम कुमार (जी आर इन्फ्रा कंट्रक्शन खीर्डी एच आर)यांचा आश्रम कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला तसेच परिसरातील गावागावांतील भजन मंडळ, व प्रतिष्ठित नागरिक सरपंच पोलीस पाटील यांचा सुद्धा आश्रम कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील 2000भक्ताची उपस्थिती होती,कार्यक्रमाचे संचालन श्री संतोष पोडे यांनी केले श्री बळीराम जी हेपट यांनी आभार मानले, या कार्यक्रमाला आश्रमातील सर्व सेवेकऱ्यानी सहकार्य केले तसेच भक्तांना महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये