ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वॉशआऊट मोहिम : वर्धा जिल्ह्यातील पोलीसांची कारवाई

देशी दारु, विदेशी दारु, गावठी मोहा दारु व साहित्यासह १ कोटी ५२ लाखाचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक १५-०२-२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यात १९ पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध वाश ऑउट मोहीम राबविण्यात आली. अवैध दारुनिर्मिती, दारु विक्री, दारु वाहतुकी विरुध्द वॉशआऊट मोहिम राबवुन कारवाईत देशी दारु, विदेशी दारु, गावठी मोहा दारु व साहित्यासह १ कोटी ५२ लक्ष ९८ हजार २०५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये ०५ लाख ६१ हजार १७५ रुपयाच्या ५१०५ लिटर गावठी मोहा दारु, ६२ हजार १७० रुपयाच्या ७०.३८ लिटर देशी दारु, ६९ हजार ९०० रुपयाचा ३७.४८ लिटर विदेशी दारु व १ कोटी ४४ लाख १४ हजार ९६० रुपयाच्या ११४८०० लिटर गावठी मोहा दारु सडवा जप्त करण्यात आला असून एकुण किंमत १ कोटी ५२ लाख ९८ हजार २०५ रुपये इतकी आहे. या कारवाईत आरोपीतांनी दारु वाहतुकीकरीता वापरलेले १ लाख ९० हजार रुपयाचे तिन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून सदर कारवाईत ६२ हजार २१५ रुपयाचे दारु बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. असा एकुण १ कोटी ५२ लाख ९८ हजार २०५ रुपयाचा दारु व साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर वॉशआऊट मोहिम दरम्यान वर्धा जिल्ह्यातील दारु विक्रेते, वाहतुक करणारे व दारु निर्माण करणा-यांवर एकुण १०६ गुन्हे नोंद करण्यात आले एकूण ११७ दारू विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली.

 सदर कारवाई हि आजपावेतो सर्वात मोठी कारवाई आहे.

   सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व वर्धा जिल्ह्यातील संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचा-यांनी यांनी केली.

पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांना अवैध दारू विक्रेत्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. 2024 मध्ये, पोलिसांनी 31 कोटी 33 लाख 33 हजार 193 रुपयांची दारू जप्त केली, तर 2023 मध्ये ही रक्कम 22 कोटी 61 लाख 61 हजार 206 रुपये जप्त केली होती

वर्धा पोलीस यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर ‘वॉश आऊट’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला पूर्णपणे नष्ट करणे आहे.

या कठोर कारवाईमुळे वर्धा जिल्ह्यातील अवैध दारू विक्री कमी होईल, कारवाई बद्दल जनतेकडून समाधान व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये