ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यासाठी पर्यावरण सेवा योजनेचे व इको क्लबचे स्वयंसेवक यांनी स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसुटकर, प्रा. सचिन भैसारे, प्रा. नरेंद्र हेपट, प्रा. सुधीर थिपे, प्रा. आशिष देरकर, प्रा.प्रशांत पवार व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



