ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कीटकनाशक फवारणीने धान पीक धोक्यात

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 धान पिकावर कडपासारखा रोग आल्याने रोग नियंत्रणासाठी कृषी केंद्रातून औषधी आणली व धान पिकावर फवारणी केली मात्र रोग बरा होण्याऐवजी धानाची मुदत होऊनही निसवा होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. असा प्रकार भारपायली येथील शेतकरी अशोक चिलकलवार यांच्या बाबतीत घडला असून ४ एकरचे धानपीक नष्ट झालेले आहे तर सदर औषधीचा वापर करणाऱ्या १० च्या वर शेतकऱ्यांची अशीच बोंब असून चौकशी करून कंपनीवर कारवाईची मागणी होत आहे.

       भारपायली येथील शेतकरी अशोक चिलकलवार यांनी सावली येथील सुरभी कृषी केंद्र येथून आयपीएल कंपनीचे सॉलिड नावाचे व वालीडामायसीन मात्रा असलेले ५०० मिलिलीटर कीटकनाशक खरेदी करून ४ एकर धानपिकावर १५ दिवसापूर्वी फवारणी केली. रोग तर बरा झाला नाही मात्र धानपिकाचा कालावधी पूर्ण होत असतांनाही निसवा न आल्याने शेतकरी घाबरले.

शेतकऱ्याने खरेदी केलेल्या कृषी केंद्रात चौकशी केली असता या औषधीमुळे असा प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडले असल्याचे सांगत कंपनीकडे माहिती दिली असल्याचे सांगितले. यावरून सॉलिड या कीटकनाशकामुळेच धानपीक उध्वस्त झाल्याची खात्री झाली असून कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी अशोक चिलकलवार यांचेकडून होत आहे. जुलै महिन्यात रोवणी केलेले धान हातात येण्याच्या काळात नष्ट होत असल्याने शेतकरी लाखो रुपयांच्या नुकसानीने आर्थिक अडचणीत सापडला आहे.

      सॉलिड या कीटकनाशकामुळे धान निसवा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत कंपनीकडे माहिती दिली असून चौकशीसाठी येणार आहेत.

              केंद्रचालक, सुरभी कृषी केंद्र सावली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये