ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मांगलगाव येथे श्री गुरुदेव पालखी प्रस्थान सोहळा 

ग्रामगीतेचे जनजागरण करणारी मांगलगावच्या पालखीची मंगलमय परंपरा प्रेरणादायी - बंडोपंत बोढेकर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 मांगलगावची श्रीगुरुदेव पालखी पदयात्रा गुरूकुंज आश्रमात होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकरिता रवाना झाली. मांगलगाव येथे या पालखी पदयात्रा प्रस्थान समारंभाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले होते. गाव परिसरातील भजनी मंडळे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक आणि समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन गावातून सामुहिक रामधुन काढली जाते. या पालखी पदयात्राचे गावातील प्रमुख चार चौकात मोठ्या श्रद्धेने स्वागत करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदन केले जाते. गावातील प्रमुख मार्गावरून जात असताना यावेळी पालखीचे स्वागत ठाकरेवाडा, रंदये चौक, युवा शेतकरी गृप , ढोणे वाडा या चार ठिकाणी केले गेले.

   शेवटच्या पालखी पूजन प्रसंगी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सरपंच प्रफुल कोलते, ज्येष्ठ प्रचारक राजेंद्र हजारे, पालखी प्रमुख भानुदास रदंये , माजी पालखी प्रमुख मारोती ठाकरे, विश्वास पाचभाई, आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

       यावेळी बंडोपंत बोढेकर म्हणाले की , मांगलगाव ची

श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांची गेल्या ५६ वर्षांपासूनची परंपरा प्रेरणादायी आहे. या भागात ग्रामगीतेतील जीवनमूल्यांचा विचार जगणारी अनेक माणसे पाहून समाधान वाटते आहे.मांगलगाव ते मोझरी या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गावात राष्ट्रसंतांच्या विचारांचे जनजागरण दरवर्षी या पालखी पदयात्रेतून केले जात आहे. त्यामुळे नव्या पिढीत राष्ट्रसंताचा परिवर्तनवादी, ग्रामसुधारणेचा विचार रूजवण्यासाठी निश्चित मदत होते आहे. हे लोककल्याणकारी कार्य सुरू ठेवावे, राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत सदोदित तेवत ठेवावी. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

      यावेळी सरपंच प्रफुल कोलते, रामराम धारणे, पालखी प्रमुख भानुदास रदंये आदी ज्येष्ठ सेवकांनी समयोचित विचार व्यक्त केले. राष्ट्रवंदना गायन आणि सहभोजनाने पालखी प्रस्थान सोहळ्याचा समारोप झाला. या सोहळ्यात सर्व समाजाचे महिला पुरुष मंडळी मोठ्या आस्थेने सहभागी झाले होते. गावात एकंदरीत दिवाळीसारखे चित्र दिसत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये