ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीजवळील ऑर्डिनन्स फॅक्टरी परिसरातील मॅगजीन जंगलाला भीषण आग 

मोठी दुर्घटना टळली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ शहरालगत असलेल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मागील भागातील प्रतिबंधित मॅगजीन जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भागातील आग वेगाने पसरत असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

आग ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या दिशेने जाऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाभरातून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. भद्रावती नगर परिषद, चंद्रपूर महानगरपालिका, वरोरा नगर परिषद तसेच थर्मल पॉवर स्टेशन येथील अग्निशमन बंब मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दल, आयुध निर्माणी व्यवस्थापन आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले असून मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या संबंधित विभागांकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य धोका टळल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये