ताज्या घडामोडी

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे संविधान दिन 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.

मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जनतेला सर्वसमावेशक भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अर्पण केले. भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान देशात लागू करण्यात आले.

यावेळी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, शारदा झाडे, निशा उरकुडे, प्रीती गुल्हाने, प्रीती धोटे, छाया पाटील, गीता निखाडे, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, भारती परते, नेहा कुम्मरवार, किरण बोरुले, माधुरी धुर्वे, सुशीला सुद्दाला, सुमलता काम्पेल्ली, सौंदर्या मारपेल्ली आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये