Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

लोकमान्य टिळक विद्यालय कथा कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न 

चांदा ब्लास्ट

        चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, खरी कमाई, सरस्वती पूजन, वेशभूषा स्पर्धा, वर्ग सजावट इत्यादी विविध विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

         वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभागृहात रंगतदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार सादर केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे माननीय सचिव श्री गांगेय सराफ यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती एस आर पाटील व सकाळ पाळीच्या पर्यवेक्षिका योगिनी देगमवार उपस्थित होत्या.

          या कार्यक्रमाचे संचालन कुमारी गीत पेंदाम व अनुप शंभरकर या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी सौ. देगमवार लिखित विज्ञान नाटिकेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाला पालकांची भरघोस उपस्थिती होती.

          वर्ग सजावट, खरी कमाई, कला प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा व इतर विविध स्पर्धा या कार्यक्रमांना मिडल स्कूल, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अद्वितीय असा प्रतिसाद दिला.

            सिव्हिल लाईन शाखेत माननीय उपमुख्याध्यापक श्री. प्रफुल्ल राजपुरोहित तसेच पर्यवेक्षक श्री सचिन जहागीरदार यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

          सावित्रीबाई फुले जयंतीदिनी या सर्व स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. या सर्व कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये