गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथे आय.पी.एल. सट्टा खेळणारे गजाआड ; सापडा लावून पकडले सट्टेबाज

उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांची दबंग कामगिरी

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            दि.१२/०५/२४ रोजी आय.पी.एल. मंचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळणारे आरोपी विरुध्द कारवाई करणेकरीता, श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वरोरा यांनी, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे, पो.स्टे. वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व पोलीस स्टाफसह, श्री गुयाने यांचे परी, बावने ले आउट, साई मंगल कार्यालयाच्या बाजुला, वरोरा येथे आय.पी.एल. वर सटटा खेळणारे आरोपीवर रेड केली असता, एक खोली मध्ये १) ओमप्रकाश देविदास जाधव, व २) आशिष गजानन जाधव, रा. वरोरा हे लॅपटॉप व मोबाईलच्या साहयाने, विन्नस्वामी स्टेडीयम, बंगलोर येथील ग्राउंडवर, चालु असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूध्द रॉयल चॅलेन्जर्स बैंगलोर या इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आय.पी.एल.) लाईव्ह मॅचवर, पैशाची बाजी लावुन, व मोबाईलवरून, ग्राहकांकडुन मॅचचे सौदे घेउन, हार-जितचा जुगार खेळ खेळीत (सट्टा लावतांना) असतांना मिळून आले. वरून घटनास्थळावरून १० मोबाईल, ०१ लॅपटॉप, ०१ पेन ड्राईव्ह, ०२ कॅलक्युलेटर, एक अॅक्टीवा मोपेड, व इतर साहीत्य तसेच नगदी रक्कम ३२,७४० रू. असा एकून ०२,६७,४५० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नामे १) ओमप्रकाश देविदास जाधव, वय ४३ वर्ष, २) आशिष गजानन जाधव, वय २७ वर्ष दोन्ही रा.सुभाष वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय वरोरा, पाहीजे आरोपी ३) मिनाज शेख रा.वणी जि. यवतमाळ ४) जम्मू शेख रा.वणी जि.यवतमाळ ५) रितीक जाधव रा. वरोरा, ६) अमोल डांगरे रा.वरोरा ७) अमोल टिपले रा. वरोरा ८) बादल लाखा रा. वरोरा ९) भुषण दिक्षीत रा. वरोरा १०) डॉ. काळे रा. वरोरा ११) अजिंक्य नरडे रा. वरोरा १२) अमित घोडमारे रा. वरोरा १३) समीर पाटील रा. वरोरा १४) सुरज रा बुट्टीबोरी नागपुर. १५) राजेश तुपकर रा. वरोरा १६) रवि गभणे रा. वरोरा १७) राहुल टिपले रा. वरोरा १८) पिंटू तडस रा. वरोरा १९) पिन्टु टोंगे रा. वरोरा २०) प्रसाद खडसान रा. वरोरा २१) कुणाल चिमुरकर रा. वरोरा २२) मोहीत शर्मा रा.वरोरा २३) अनिल पाटील रा. वरोरा २४) पंकज वैद्य रा. वरोरा २५) अमित भगत रा. वरोग २६) गौरव रा.वरोरा २७) रणजित रा. वरोरा २८) अनुल वानखेडे रा. वरोरा २९) मंगेश रा. भद्रावती ३०) मंगेश रा. वरोरा यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.

सदर कारवाई श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, पंद्रपुर, श्रीमती रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली, श्रीमती. नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग बरोरा, सपोनि विनोद जांभळे, पो.अं.दिपक दुवे, दिपक मेश्राम, रिषभ काटकर, जितेंद्र राजुरकर, मोहन निषाद, राजु लोधी, विशाल राजुरकर, प्रशांत बावणे, चालक हेपट यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये