Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावखेड भोई येथे एम टी आर एस व राजलक्ष्मी ग्रुप तर्फे रोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई येथे दि.१० जून रोजी एम टी आर एस करिअर हब व राजलक्ष्मी गृप यांच्या वतीने गावातील सर्व बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगार विषयक व व्यक्तीमत्व विकास संदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या काळात आपल्या भविष्याविषयी कशा पद्धतीने जागरूक असले पाहिजे यासोबतच व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणच्या माध्यमातून आपण नोकरी साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कितपत आत्मसात करू शकतो याचे सखोल प्रतिपादन प्रास्ताविकाच्या माध्यमांतून एम टी आर एस करिअर हब च्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.

एम टी आर एस व राजलक्ष्मी गृप ने सुरू केलेला उपक्रम परिसरातील तरुणांना प्रशिक्षणासोबतच मुलाखती च्या संधी देऊन रोजगार मिळवून देऊ शकतो त्यामुळे निश्चितच गावातील सर्व नवयुवक व बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन आपल भविष्याविषयी सजग राहण्याचे आवाहन एम टी आर एस च्या समुपदेशक अर्चना मॅडम यांनी केले. आपल्या तालुक्यातील सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा व त्यातून त्यांची कौशल्ये उत्तमरीत्या वृध्दींगत झाली पाहिजे यासाठी MTRS व राजलक्ष्मी गृप यांनी ही संकल्पना आपल्या जिल्ह्यात व आपल्या तालुक्यात आणली त्यामुळे या संधीचा पुरेपूर लाभ आपल्या तरुण वर्गाने घ्यावा असे प्रतिपादन कृषि उद्योजक तथा राजलक्ष्मी गृप चे सि.ई.ओ. सुजीतजी गुप्ता यांनी केले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये ग्रा.प.सदस्य नारायण जाधव, ग्रा.पं.सदस्य महेंद्र जाधव, सुजितजी गुप्ता,रामेश्वर तिडके,सर्व ग्रामस्थ,मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग तसेच एम टी आर एस व राजलक्ष्मी ग्रुपचे सर्व प्रतिनिधी आदींचा समावेश होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये