ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिरादेवी गावाजवळील शेत शिवारात वाघाचा दिवसाढवळ्या वावर ; वाघाच्या भितीने शेतमाल शेतातच

शेतात जाण्यासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

                तालुक्यातील चिरादेवी येथे मागील एका महिन्यापासून चिरादेवी शेतशिवारात वाघाचा दिवसा ढवळ्या वावर असून शेतकरी शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतीचे कामे युद्धपातळीवर सुरू असून शेतकरी शेतामध्ये जाण्यास हतबल झाला असुन शेत मजूर सुद्धा शेतीच्या कामाकडे जाण्या करिता पाठ फिरवली आहे.

              चिरादेवी या गावात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्याचसोबत शेळीपालन व्यवसाय सुद्धा बऱ्यापैकी आहे. शेतकऱ्यांंना जनावरे व बकरी चारण्यासाठी लोकांना पडीत जमीन व जंगलाचा आधार घ्यावा लागतो. परंतु नेमक्या त्याच ठिकाणी वाघाचा वावर आहे. त्यामुळे गुराख्याला गुरे चारण्यासाठी जावं कि नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसापूर्वी चिरादेवी येथील शेतकरी प्रकाश आत्राम यांची कालवड सुद्धा वाघाने फस्त केली होती. त्याचदरम्यान गोरजा येथील २ बकऱ्या मारल्या. हि घटना ताजी असतांना दि. 28 जानेवारीला सांयकाळच्या सुमारास शेतकरी विठ्ठल उपरे हा घराकडे गुरे घेऊन जात असतांना त्यांच्यावर वाघाने हमला केला. परंतु त्यांनी सावधगिरी बाळगल्याने थोडक्यात बचावले आहे. तसेच दिवसेंदिवस असेच होत राहीले आणि दुधाळ जणांवरांना वाघांनी मारले तर त्या शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत येईल. आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. चिरादेवी, गवराळा, गोरजा येथील शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जाऊन शेतीचे कामे करावी लागत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावी अशी मागणी चिरादेवी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

वर्षन :- मागील एक महिण्यापासून चिरादेवी शेत शिवारात वाघाची दहशत सुरू आहे. रोज जनावरांवर वाघाचे हमले होत आहे. काल रविवारी सायंकाळी घराकडे गुरे घेऊन जात असताना वाघांनी माझ्यावर हमला केला. मी सावधगिरी बाळगल्याने थोडक्यात बचावलो. चार – पाच शेतकऱ्यांनी त्याला हुसकावून लावले. असे हमले होत राहिले तर आम्ही जनावरे चारायचे कसे? वनविभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा..

                 विठ्ठल उपरे – गुराखी चिरादेवी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये