ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शर्वरी गुंडावार यांची कामगिरी चंद्रपूरसाठी भूषणावह – राहुल पावडे

भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी केला गुंडावार कुटुंबीयांचा सत्कार

चांदा ब्लास्ट

भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने नुकतेच चंद्रयान ३ हे अभियान राबवून ते यशस्वी केले आहे. यामध्ये देशभरातून अनेक शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. यात चंद्रपूर येथील मूळची वडगाव रहिवासी असलेली शर्वरी गुंडावार या तरुणीचा समावेश आहे. मोहिमेच्या यशस्वीतेनंतर शर्वरी गुंडावारचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

तिच्या यशाबद्दल तिच्या आई-वडिलांचा भाजपचे महानगर अध्यक्ष तथा महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे माजी नगरसेवक देवानंद वांढई रवी जोगी अमोल मते यांच्या राहते घरी जाऊन सत्कार केला व तिला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना राहुल पावडे म्हणाले की, चांद्रयान ३ ची यशस्वीता ही देशाला वैज्ञानिक क्षेत्रात जागतिक महाशक्ती रुपात पुढे घेवून आली. आणि या अभुतपूर्व यशात चंद्रपूरची तरुण वैज्ञानिक सहभागी आहे, ही चंद्रपूर साठी भूषणावह बाब आहे. शर्वरी गुंडावार हीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तरुणांनी तिच्या कार्यातून प्रेरणा घेवून आदर्श घ्यावा.यावेळी गुंडावार कुटुंबीय व राहुल पावडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये