ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टेकामांडवा, शेणगांव व अन्य गांवात ‘घर चलो अभियान’

हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात महाजनसंपर्क अंतर्गत कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वामध्ये जिवती तालुक्यातील टेकामांडवा, शेणगांव, पाटन व नानकपठार, हिमायत नगर येथे माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून सर्वसमावेशक ‘घर चलो अभियान’ राबविण्यात आले.

या महाजनसंपर्क अभियानामध्ये भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे जिवती पं.स. चे माजी उपसभापती महेश देवकते, गिरमाजी, सुरेश केंद्रे, शिवाजी सेलोकर, कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, अरूण मडावी, डॉ. येरमे, रमेश आडे, भूते पाटील, प्रतिक सादनपवार, तुकाराम वारूलवाड, संदिप शेरकी, रामसेवक मोरे, शिवाजी पल्लेवाड, अनिल येले, अजिम, अनंता बावळे, मनोज तुमराम, तिरूपती कन्नाके, सरपंच विनोद जुमनाके, प्रमोद कोडापे, भिमराव पवार, खंदारे यांची उपस्थिती होती. यावेळी हंसराज अहीर व अन्य नेते, पदाधिकारी यांनी नागरिकांना केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजनांची पत्रके वितरीत केली. केंद्र सरकारच्या 9 वर्षातील लोकाभिमुख कार्याची माहीती दिली. सेवा, सुशासन व गरीब कल्याण वर्षाबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. सरल ऍप, नमो ऍप, फ्रेन्डस ऑफ बीजेपी आणि केंद्र सरकारच्या हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल करून भाजपाला समर्थन देण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी या अभियाना अंतर्गत केले.

या कार्यक्रमाच्या अनुशंगाने हंसराज अहीर यांनी कोरपना तालुक्यातील चिंचोली (बेलगांव) येथे हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य व रक्तदान शिबीरास भेट देवून या कार्यक्रमाची प्रशंसा केली. येथील आरओ प्लांटचे लोकार्पण केले. या घर चलो अभियानादरम्यान हंसराज अहीर यांनी आदर्श शेतकरी रामसेवक मोरे, युवा उद्योजक निलेश ताजणे तसेच एव्हरेस्ट शिखर गाठणाऱ्या युवकाचा सत्कार केला. चिखली या गांवातील महादेव कोळी समाजातील बांधवांचे निवेदन स्विकारले नगराळा येथे अनेक महिला व युवकांनी हंसराज अहीर व अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी अहीर यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या. या महाजन संपर्क अभियानाला नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये