श्रीनगर येथील श्री.गुरुदेव क्रिडा मंडळाला क्रिडा साहित्याचे वितरण
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) यांचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
तालुक्यातील श्रीनगर येथील श्री. गुरुदेव क्रिडा मंडळाला नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) च्या वतीने व माजी तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील श्रीनगर येथील श्री.गुरुदेव क्रिडा मंडळ यांना आज दिनांक ५ सप्टेंबर २०२३ ला नुकतेच विविध स्पर्धात्मक जसे की हाॅलीबाल,गोडा,बॅटबिंटन,चेस, फुटबॉल, इत्यादी क्रिडा साहित्याचे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौक चंदनखेडा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालीक हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते मंडळाच्या उपस्थित मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री.गुरुदेव क्रिडा मंडळ श्रीनगर चे अध्यक्ष गणेश शिवरकर, सचिव महेश बावणे,कोष्याध्यक्ष प्रज्योत राहुलगडे, सदस्य संतोष बावणे, शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार,पंकज दडमल, मंगेश हनवते, देवानंद दोडके,भुपेश बोढे, कुणाल ढोक व नेहरू युवा केंद्राचे भद्रावती तालुका माजी समन्वयक आशिष सुरेश हनवते प्रामुख्याने उपस्थित होते.