ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कंपनी सेक्रेटरी- एक करिअर यावर एकदिवसीय सेमिनारचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात प्लेस एन एन एस व भारतीय कंपनी सचिव संस्थान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनी सेक्रेटरी एक करिअर यावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ एल एस लडके, प्रमुख वक्ते कंपनी सेक्रेटरी मोहित बत्रा सेक्रेटरी आय सी एस आय नागपूर , कंपनी सेक्रेटरी सुधाकर ऐसलावार व समन्वयक डॉ. गजेंद्र बेदरे उपस्थित होते.

सर्वप्रथम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव स्वर्गीय निळकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी प्रा डॉ गजेंद्र बेदरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या कार्यक्रमा मागचा हेतू स्पष्ट करीत सर्वांनी कंपनी सेक्रेटरी या करिअरविषयी विचार करावा असे आवाहन केले.

या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक कंपनी सेक्रेटरी मोहित बत्रा यांनी पावर पॉइंट च्या माध्यमातून कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनी सेक्रेटरीच्या कामाचा उपयोग मोठे मोठे उद्योजक तसेच व्यापार करणारे कसे करून घेतात यावर सखोल मार्गदर्शन केले.

तसेच कंपनी सेक्रेटरी सुधाकर एसलवारू यांनी कंपनी सेक्रेटरी या करिअरसाठी लागणारा अभ्यासक्रम, परीक्षा, फीस तसेच त्यानंतर आपण काय काय करू शकतो यावर आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सर्वप्रथम भारतीय कंपनी सचिव संस्थान नागपूर यांचे स्वागत व आभार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी सुद्धा आजच्या आव्हानांच्या जगामध्ये रूढीवादी करियर सोडून नवीन क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवावे तसेच शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःला दुसऱ्यांना नोकरी देऊ शकणार एवढं स्वावलंबी बनवावे बदलत्या काळामध्ये स्वतःमध्ये बदल घडवणे ही आजच्या काळाची गरज आहे असे आवाहन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉॅ. गजेंद्र बेदरे प्रा कुलदीप भोंगळे श्री प्रमोद तेलंग, मोनालीसा साने, मयुरी बालपणे, प्रांजली मून, जानवी पाजरे, यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये