ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथील खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर, विसापूर येथे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा चे आयोजन दिनांक २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली.

या स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील कुमारी रितिका बोस या खेळाडूंची गोळाफेक, थाळीफेक, आणि भालाफेक तसेच रोहन कांबळे या खेळाडूंची भालाफेक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेकरिता निवड झाली. महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन डेरवण, रत्नागिरी जिल्हा येथे ३० सप्टेंबर ते १ आक्टोंबर २०२३ पर्यंत होणार आहे. खेळाडूंनी या यशाचे श्रेय महाविद्यालयाला दिले आहे.

महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. खेळाडूंच्या या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जंयताभाऊ टेंमुर्डे, सचिव अमनभाऊ टेंमुर्डे, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, प्रा. डॉ. टोंगे, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, प्रा. डॉ. तितरे, प्रा. डॉ. घुमे, प्रा. मोहित सावे, प्रा. कापगाते, प्रा. मालेकर, प्रा. लांबट तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये