ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विसा संघ तर्फे डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार

महाराष्ट्रात मराठी भाषा पदवी पर्यंत सक्तीची करावी : डॉ रवींद्र शोभणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

वि सा संघ शाखा भद्रावती तर्फे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी “महाराष्ट्रात पदवी पर्यंत सर्वच शाखांना मराठी भाषा आवश्यक करावी” असे प्रतिपादन त्यांनी केले.

अमळनेर येथे आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, समीक्षक, वि.सा. संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. हा विदर्भासाठी बहुमान असून वि सा संघाच्या शताब्दी वर्षात त्यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी निवड होणे फार महत्त्वपूर्ण समजले जाते.
वि सा संघ शाखा भद्रावतीच्या वतीने त्यांचा सत्कार निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या सभागृहात भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रविंद्र शोभणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वि.सा.संघ शाखा भद्रावतीच्या वतीने विविध साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हे नवोदितांसाठी उपयुक्त आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

या सत्कार प्रसंगी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ कार्तिक शिंदे , डॉ.प्रिया शिंदे, प्राचार्य डॉ एल एस लाडके, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. सुरेश परसावार , वि. सा. संघाचे प्रवीण आडेकर, शालिक दानव, अनिल पिट्टलवार, रमेश भोयर, सु वि.साठे, खुशालदास कामडी, प्रशांत उज्ज्वलकर, किशोर ढोक, रमेश चव्हाण, दिलीप मुजुमदार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि सा. संघाचे अध्यक्ष डॉ. सुधीर मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन वि सा.संघाचे सचिव डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये