ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.नितिनजी गडकरी यांनी दिपाली व अंजली राठोड यांना दिला चर्चेसाठी वेळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नागपूर येथील दिपाली व अंजली राठोड आठव्या व नवव्या वर्गात शिकत असून कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय शालेय अभ्यासात अव्वल दर्जा सातत्यपूर्ण कायम ठेवला आहे. शालेय अभ्यासाशिवाय अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो हे उल्लेखनिय आहे.

आरोग्यदायी कुटूंबासाठी जैविकशेती या विषयांवर राष्ट्रीय स्तरांवर सादरीकरण झाल्यानंतर अनेक शाळां,महाविद्यालय आणि सामाजिक संस्थेत त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण झालेले आहे. या प्रवासात अनेकांचे मार्गदर्शन त्यांना प्राप्त झाले.केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतील मध्य भारतातील सर्वात मोठ्या अॅग्रो व्हिजन कार्यक्रमातही परभणी कृषि विद्यापिठाचे कुलगुरु राहीलेले,सरकारच्या अनेक समित्यांवर राहून कार्य केलेले आणि भारतातील नामवंत कृषी शास्त्रज्ञ डॉ. सि.डी.माई पुढाकाराने आरोग्यदायी परीवारांसाठी परसबाग, छतावरील बगीचा या विषयांवर पहिल्यांदा कमी वयाच्या शालेय विद्यार्थी दिपाली व अंजली राठोड यांना संधी मिळाली. अॅग्रो व्हिजन कार्यक्रमात प्रभावीपणे सादरीकरण झाले. दोघींचे वाचन, चिंतन,चर्चा वाढल्याने ज्ञानात भर पडली.आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्या प्रयोगाला प्रत्यक्ष भेट दिले आहेत.

जैविकशेती या विषयांवर दिपाली व अंजली राठोड यांनी एका इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे लेखनही त्यांनी पूर्ण केले असून लवकर त्याचा प्रकाशन सोहळा ते आयोजन करणार असल्याचे समजते. त्यांनी केलेल्या प्रयोगांवर,पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्र्याचा वेळ मिळावा हा स्वाभीमानाचा व कौतुकाचा विषय आहे. दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांच्या ज्वलंत व जिव्हाळ्याच्या विषयावरील कार्य व पुस्तक लेखनाच्या धाडसाची सर्वत्र दखल घेतली जात आहे हे विषेश.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये