चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

भाजपचे केंद्रातील पेट्रोलियम मंत्री यांनाही मागणीचे निवेदन देऊन चर्चा

पेट्रोल पंप हटाव कृती समिती हिंगणघाट तर्फे

 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवें

आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी,पेट्रोल पंप हटाव कृती समिती हिंगणघाट तर्फे आंबेडकरी व पुरोगामी संघटना यांनी आक्रोश मोर्चा काढला असतांना पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगणघाट कृती समितीचे समनव्यक व कार्यकर्ते यांना हेतुपुरस्सर ताब्यात घेतले !
याला जातीयवादच म्हणावे लागेल. लोकशाही मार्गाने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु सरकार व पोलिस प्रशासनाची ही हुकूमशाही आहे.या शासनाच्या निर्दयी प्रवृत्तीला आम्ही भीम सैनिक म्हणून संविधानिक मार्गाने आंदोलन करुन उत्तर देऊ व न्याय मिळवू.
वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समिती महाराष्ट्र सरकारमधील प्रमुख नेते,शरदचंद्र पवार, गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री ना. डॉ.नितिन राऊत,वर्धा चे पालकमंत्री ना. सुनिल केदार तसेच जिल्ह्यातील आमदार व खासदार तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी,भाजपचे केंद्रातील पेट्रोलियम मंत्री यांनाही मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली परंतु फक्त त्यांच्या कडुन प्रलोभने देण्यात आली.वर्धा शहरातून १५ आगस्ट स्वतंत्रदिनी लगभग १५ हजार अधिक जनसमूहाने तीव्र आक्रोश मोर्चा काढला.धरणे ,निदर्शने आंदोलने केली आणि यावेळी वर्धा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात साखळी उपोषण आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकारला जाग मात्र आली नाही.त्यामुळे वर्धा जिल्ह्यातून जनसमूहाने वर्धा सिव्हील लाईन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंप ची जागा त्वरीत बदलविण्यात यावी व हा पेट्रोल पंप दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका ठाम आहे.सरकार व पोलिस प्रशासनाने जनसामान्यांच्या अस्मितेशी दगाबाजी करु नये , संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे महानायक आहेत.


हिंगणघाट येथे हजारो आक्रोश मोर्चेकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचा व महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केला !
येथिल पेट्रोल पंप हटाव कृती समितीने,वर्धा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगतची पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंप ची जागा त्वरित बदलवावी या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढला असतांना या आक्रोश मोर्चाला जाणूनबुजून चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.पोलिस निरीक्षक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार हिंगणघाट कृती समितीचे कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समिती वर्धा,महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार व पोलिस प्रशासनाचा जाहिर निषेध नोंदवित असुन , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मार्गाने आंबेडकरी अस्मितेचे आंदोलन अधिक तीव्रतेने पुढेही करण्यात येईल . राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुनिल केदार यांची वर्धा कृती समितीने भेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेतली असतांना त्यांनी सुध्दा भूमिका स्पष्ट केली नाही.मौन ठेवले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर चौक हे जनसमूहाचे व आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्रोत आहे.आम्हाला लढतांना मरण आले तरी बेहत्तर,न्याय मिळाल्याशिवाय कदापी मागे हटणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button