ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानोली खुर्द येथे आदर्श शिक्षकाचा केला सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मानोली खुर्द येथील कर्तव्य दक्ष शिक्षक राजेश पवार यांना नुकताच 5 सप्टेंबर रोजी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले, अशा आदर्श शिक्षकाचा मानोली खुर्द येथील शिक्षक, शालेय समिती,ग्रामपंचायत व गावकऱ्याकडुन शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार व वाढदिवस साजरा केला.

शाळेला व गावाला दिलेले योगदान हे खरोखरच वाखण्या योग्य आहे, सातत्याने प्रयत्न करून चालवलेले रात्र अभ्यास वर्ग शिक्षण प्रेमी यांच्या साहाय्याने, डॉ.कलाम वाचनालय व अभ्यासीकाची स्थापना,कोवीड लसीकरण मोहीम,शाळेची पटसंख्या सातत्याने वाढ , विविध शालेय उपक्रम सातत्याने राबवतात, उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना सदैव मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकर, गणेश चव्हाण,विजय परचाके व केंद्र प्रमुख विलास देवाळकर, संजय त्रिपतीवार यांचे लाभले.

शाळेतील शिक्षक वनपाल सोयाम ,जी.व्ही.पवार ,सिता मेश्राम,यांना पुरस्काराचे मानकरी समजतात, यांच्या सहकार्याने हा सन्मान मिळाला, त्यांना सहकार्य करणारे,संध्या थिपे,प्रतिभा रायपुरे शिक्षिका,अरूण , दुर्योधन, संदिप, मोतीराम शिक्षण प्रेमी तथा शालेय समिती अध्यक्ष दिनेश आदे व शंकर रामटेके शालेच्या विकासासाठी सदैव तत्पर राहतात.

गावकऱ्यांनी सत्कार व वाढदिवसाच्या निमित्ताने स्नेहभोजनाचा विद्यार्थ्यांसोबत आस्वाद घेतला,या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वनपाल सोयाम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये