गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी मोहा दारू पकडून 4 लाख 64 हजार 700 रू चा माल जप्त

डी.बी. पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दि. 24/05/2024 रोजी वॉशवऑउट मोहीम दरम्यान मुखबिरकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन समुद्रपूर चे ठाणेदार संतोष शेगावकर साहेब यांचे मार्गदर्शनात यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून, मौजा गणेशपूर पारधी बेडा येथे गावठी मोहा दारू गाळण्याकरीता मोठ्या प्रमाणात मोहा रसायण सडवा साठवुन ठेवलेला आहे.

अशा माहीती वरून पोलीस स्टॉफ व होमगार्ड सैनिक याचे सह शिवणी पारधी बेडा येथे जावुन वाशऑउट मोहीम राबविली असता मोहीमे दरम्यान 10 लोंखडी ड्रम मध्ये 2,000 लि. कच्चा मोहा सडवा रसायण, 16 मोठया प्लॉस्टीक ड्रममध्ये 2400 लि. कच्चा मोहा सडवा रसायण, 19 लहाण प्लास्टीक ड्रममध्ये 1900 लि. कच्चा माही सडवा रसायण, 16 प्लॉस्टीक कॅन मध्ये 560 लि. गावठी मोहा दारू, असा जु. कि. 04,64,700 रू चा मुददेमाल मिळुन आला. गावठी मोहा दारू व मोहा रसायण सडवा ड्रमसह जे. सी. बि. मशीनचे मदतीने जागीच फोडुन फेकुण नाश करून 3 आरोपीतांन विरूध्द गुन्हा करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. याचे निर्देशाप्रमाणे मा. स.पो.नि. संतोष शेगावकर ठाणेदार पो. स्टे. समुद्रपूर याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोउपनि अनिल देरकर, डि. बि. पथक प्रमुख पोलीस नाईक प्रमोद थुल, राजेश शेंडे, सचिंन भारशंकर पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, अशिष कांबळे व होमगार्ड सैनिक यांनी सदरची कार्यवाही केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये