Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीसांनी पकडली बनावटी विदेशी दारू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 24/05/2024 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोहवा शैलेश चाफलेकर वत्यांची टिम पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलींग करीत असता मुखबीर कडुन माहीती मिळाली कि, चंदन प्रकाश साळुंके वय 27 वर्ष, रा. कजर मोहल्ला, इतवारा बाजार, वर्धा हा आपले राहते घरी बनावटी विदेशी दारू बनवत आहे, अशा माहीती वरूण नमुद पंच व पो स्टॉफसह नमुद ईसम चंदन साळुके याचे घरी जाउन त्याचे दार वाजविले असता त्याने दार उघडले, त्यास आमचा व पंचाचा परीचय देउन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरझडतीत 1) आर एस कंपनीच्या बनावटी विदेशी दारूच्या 55 शिशी प्रती शिशी 300/- रू प्रमाणे 16,500/- रू, 2) ओसी ब्लु कंपनीच्या बनावटी विदेशी दारूच्या 11 शिशी प्रती शिशी 250/- रू प्रमाणे 2750/- रू. 3) गोवा विस्की कंपनीच्या स्पिरीट ऑफ स्मुथनेस लिहीलेले बनावटी दारू बनविण्या करीता वापरण्यात येणारे 750 मिलीचे 7 बंपर प्रती बंपर 445/- रू प्रमाणे 3115/- रू व दारू बनविण्या साठी वापरण्यात येणारे ईतर साहित्य असे एकुण कि 23,115/रू चा माल मिळुण आल्याने तो जप्त करूण आरोपी विरूदध गुन्हा नोंद करूण आरोपीस अटक करण्यात आली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, तत्कालीन पोलीस निरीक्षक वर्धा कांचन पांडे, यांच्या मार्गदर्शनात सपोनी गणेश बैरागी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, पवन लव्हाळे, पोशी नंदकिशोर धुर्वे, शिवा डोईफोडे, रंजीत भुरसे, अमोल साळवण, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये