Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बकराची व कोंबड्यांची चोरी करणाऱ्या चोराट्यान्या सेवाग्राम पोलिसांनी घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे कृष्णा मधुकर पोटदुखे वय 52 वर्ष जात तेली व्यवसाय शेती रा. वार्ड 02 मांडवगड ता.जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिली की माझ्या शेतामध्ये असलेले एक लाल रंगाची बकरी किंमत 4,500/- रुपये एक काळी पाठ किंमत 3,000/- रुपये एक बोकड किंमत 3,500/- रुपये दोन पाठ किंमत 3,000/- रुपये एक काळी बकरी किंमत 4,500/- रुपये एक चितळी बहाली बकरी किंमत 3,500/- रुपये एक काळा बोकड किंमत 2,500/- रुपये एक लाखी पाठ किंमत 2,000/- रुपये बेड्यावर असलेला एक कोंबडा किंमत 5,00/-रुपये तसेच एक कोंबडी किंमत 500/- रुपये ऐकुन जु.कि.27,500/- रुपये असा बंद करून ठेवलेल्या बक-या व कोंबड्यांची कोणतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या आहेत अशी तोंडी रिपोर्ट पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे देण्यात आली यावरून पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करण्यात आला अपराध क्रमांक 368/2024 कलम 380 +34 भादवी दाखल करण्यात आला असून गुन्हे पथकाचे नायक पोलिस कास्टेबल गजानन कठाणे व पोलिस कर्मचारी यांच्या कडे हा तपास देण्यात आला यावेळी पोलिस कर्मचारी यांनी तपासणी आरोपी नामे 1) निखील शालीक मोहदुरे वय 28 वर्ष रा. नागापुर ता.जि. वर्धा 2) संकेत नागोराव बांडबैल वय 25 वर्ष 3) कमलाकर सुर्यभान चौधरी वय 23 वर्ष दोन्ही रा. नांदोरा ता. जि. वर्धा. यांना घटनास्थळ – मांडवगड शेत शिवार ता. जि. वर्धा 08 कि.मी पूर्व येथून अटक करून त्यांच्याकडून विचारले असता त्यांनी कबुली दिली की दि. 15/05/24 वे 19/00 ते दि. 16/05/24 वे सकाळी 07/00 वा. दरम्यान चोरी केलेली आहे त्यांच्या कडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या कडून

चोरी गेलेला माल मिळाला माल :- 1) एक मालवाहु महिंद्रा जितो क्र. MH-32-AJ-2191 कि.2,50,000 2) तिनही आरोपीचे ताब्यातुन बकरी विक्रीचे नगदी 36410 रु. असा एकुन 2,86,410 रु.चा माल. 1) लाखी रंगाची एक बकरी वय 4 वर्ष, कि, 4,500/- रु. 2) एक तिन वर्षाचे काळी पाठ कि. 3,000/-, 3) एक 1 वर्षाचा बोकड कि. 3,500/- रु., 4) दोन पाठ दोन महीण्याचे प्रती पाठ कि. 1,500/- रु. प्रमाण कि. 3,000/- रु., 5) काळी बकरी एक 5 वर्षाची कि. 4,500/-, 6) एक चितळी बहाली बकरी सहा वर्षांची कि. 3,500/-, 1) एक काळा बोकड कि. 2,500/-, 8) एक लाखी पाठ किंमत 2,000/-रु.एक कोंबडा एक कोंबडी किंमत 1,000/- रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला

सदरची ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री प्रमोद मकेश्वर, ठाणेदार श्री. विनित घागे याचे मार्गदर्शनात पो.ना गजानन कठाणे, पोहवा हरिदास काकड पोना संजय लाडे, पोशि अभय ईंगळे, चालक पोहवा विलास लोहकरे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये