ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मेरी माटी मेरा देश,आणि चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहीमे मुळे सावलीत भव्य रैली

'पोलीस स्टेशन सावलीचा उपक्रम'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

       केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात,’कलश.यात्रा”,शिलाफलक”,मेरी माटी मेरा देश( मिटी को नमन, विरोंको वंदन) आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारत मातेला प्रणाम करणे आणि, या मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या विर जवानांनी,क्रांतिकारकारांनी बलीदान दिले. त्यांना वंदन करणे,या मुख्य हेतु आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन सावली च्या माध्यमातून आज रोजी( २४ आगस्ट) सकाळ च्या सुमारास विश्व शांती विद्यालय,रमाबाई आंबेडकर विद्यालय आणि पोलिस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने सावली शहरातुन विश्व शांती विद्यालयाच्या बँड पथका सोबत वाजत गाजत भव्य रैली काढली.

चालु वर्ष भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सांगता वर्ष असल्याने या वर्षात सांगता समारोह कार्यक्रमाचे आयोजन देशभर करण्यात येत आहे.

यामुळे भारतीय नागरीकांच्या मनात भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहास अजरामर करणे व विरांची थोरवी कायम चेतवित ठेवणे हा आहे, सोबतच देशातील अवकाश संशोधन संस्था ( इस्त्रो ) च्या माध्यमातून चांद्रयान ३ हि मोहीम यशस्वी करण्यात आली, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल चांद्रयान ३ ने ठेवले व जगभरात दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॉंड्रिंग करणारा भारत हा पहिला देश बनला,या निमित्ताने सुध्दा इस्त्रो च्या संपुर्ण वैज्ञानिकांचे अभिनंदन या रैली द्वारे करण्यात आले,”भारत माता की जय” “भारतीय स्वातंत्र्याच्या विजय असो,वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी पोलीस स्टेशन सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर,विश्वशांती विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र मुप्पावार,रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे प्राचार्य शेंडे,शिक्षक गण,पोलीस कर्मचारी व दोन्ही विद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी रैलीत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये