विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी गठित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिय सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री सुधाकर अडबाले साहेब यांच्या मर्गदर्शनात कोरपना तालुका विमाशिसंच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. येथील महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकशाही पद्धतीने तालुका कार्यकारणीची निवड करून घोषणा करण्यात आली, सभेच्या अध्यक्ष स्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिय सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री सुधाकर अडबाले साहेब हे होते विमाशिसंचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री आनंद चलाख हे निवडणूक निर्णय अधिकारी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे सहकार्यवाह श्री जगदिशजी जुनगरी, विमाशिसंचे चंद्रपूर जिल्हा(ग्रामिण) चे अध्यक्ष श्री सुनील शेरकी, कार्यवाह श्री. दीपक धोपटे, महानगराचे कार्यवाह श्री सुरेंद्र अडबाले, प्राचार्य श्री. साईनाथ मेश्राम, जिल्हा समितीचे सल्लागार मा. श्री. नामदेव ठेंगणे, जिल्हा सहकार्यवाह श्री.हरिहर खरवडे व श्री. साधुजी बावणे उपस्थित होते. यात तालुका अध्यक्षपदी श्री गणेश गोडे, कार्यवाहपदी श्री प्रशांत धाबेकर, कोषाध्यक्षपदी श्री वामन टेकाम, गडचांदूर शहर अध्यक्षपदी श्री गजानन बोबडे, गडचांदूर शहर कार्यवाहपदी श्री संतोष मुंगूले उपाध्यक्ष श्री रत्नाकर लांडे, श्री शंकर वाघाडे, श्री रुपेश विरूटकर, कु. स्वेतलाना टिपले, सहकार्यवाहपदी श्री गजानन वासेकर, श्री गणेश लांडे, श्री रमेश आडे, संघटक म्हणुन श्री रामकृष्ण रोगे, श्री ए.डी.सातपुते, प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री मंगेश माडूरवार, श्री अरून मेश्राम, तर सल्लागार म्हणून श्री एच.बी.मस्की, श्री सधुजी बावणे, श्री. संजय ठावरी, सौ. विणा देशमूख यांची निवड करण्यात आली. सदर सभेचे संचालन श्री. संतोष मुंगूले, प्रास्ताविक श्री एच.बी.मस्की तर आभार प्रदर्शन श्री साधुजी बावणे यांनी केले.