Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

तसेच ५ हजार रुपयाचा दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश 3 श्री. व्हि.पी. आदोने सो यांनी आरोपी सुरेश विजय वानखेडे वय 40 वर्ष रा. तेलघानी फैल पुलगांव ता. देवळी जि. वर्धा पोलीस स्टेशन पुलगांव

1) कलम 357 भादवि मध्ये 03 वर्ष सक्षम कारावास व 1000 /- रु. दंड न भरल्यास 06 महीने सश्रम कारावास

2) कलम 354 (अ) (1) भादवि मध्ये 03 वर्ष सक्षम कारावास व 1000/-रु. दंड न भरल्यास 06 महीने सश्रम कारावास 3) कलम 3(1)(w)(i) अजाजअप्रका मध्ये 01 वर्ष सक्षम कारावास व 1000/- रु. दंड न भरल्यास 01 महीने कारावास

4) कलम 3(1) (w) (ii) अजाजअप्रका मध्ये 01 वर्ष सक्षम कारावास व 1000/-रु. दंड न भरल्यास 01 महीने कारावास

5) कलम 3(2)(va) अजाजअप्रका मध्ये 01 वर्ष सक्षम कारावास व 1000 /- रु. दंड न भरल्यास 01 महीने कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी ही एकटीच बाजारात गेली असता एक इसम तेथे आला व फिर्यादीचे हाताचे दंडाला पकडले असता फिर्यादीने माझा हात सोड असे म्हटले असता फिर्यादीचे भावाचा मित्र यश आठवले हा तेथे आल्याने त्यास बघुन तो इसम तेथुन निघुन गेला. सदर आरोपीने फिर्यादी ही अनुसुचीत जातीची असल्याने तिचा विनयभंग केला अशा रिपोर्ट वरुन गुन्हा नोंद असुन प्रकरणाचा तपास श्री गोकुळसिंग पाटील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव, यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे 101 / 22 के 354, 354(अ) (1) (I) भादवि सह 8, 12 पोक्सो सह 3 (1) (w) (i).3(1) (w) (li).3 (2) (va) अजाज नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले..

सरकारतर्फे अति. सरकारी वकील, श्री. एच.पी. रणदीवे यांनी कामकाज पाहीले तसेच त्यांना पैरवी अधिकारी

सफौ, अनंत रिंगणे, ब.नं. 175 पो.स्टे. पुलगांव व पोहवा / किशोर अप्तुरकर ब.नं. 1221 यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मौलाची कामगीरी बजावली. शासनातर्फे एकुण 06 साक्षीदार तपासले. फिर्यादी, इतर साक्षीदार तसेच सरकारी वकीलांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश -3 (श्री. व्ही. पी. आदोने) सा. यांनी आरोपीस दिनांक 23/08/2023 रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये