Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथील संबधित प्रकरणातील आरोपी निष्पन्न करुन अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दिनांक 16.05.2019 ते 23-09-2022 रोजी चे दरम्यान यातील आरोपीतांनी संगणमत करून कट रचुन फिर्यादी यांचे वडीलोपार्जीत वर्धा येथील शिट नं. 14 नगर भूमापन क्रमांक 109 मारवाडी मोहल्ला, पटेल चौक, वर्धा येथील घराचे बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करुन व बनावट मृत्युलेख तयार करुन सदरचे घर हडप करण्याचे उददेशाने फिर्यादी यांची फसवणुक केली. फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाची क्लिष्टता बघता गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा हे करीत आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात यातील फिर्याद मधील आरोपीतांना यापुर्वीस अटक करण्यात आली असुन गुन्ह्यातील ईतर बाबींवर कसोशीने तपास सुरु असतांना आरोपी राजेश शामलाल जयस्वाल वय 52 वर्ष, रा. पोद्दार बगीचा, रामनगर, वर्धा याचा सक्रीय सहभाग असल्याचे तपासात प्राप्त पुराव्यावरुन दिसुन आल्याने त्यास गुन्हयात आरोपी करण्यात आले होते.

सदर आरोपी याने ईतर आरोपीतांसह गुन्ह्यातील मालमत्तेचे कागदपत्र नसल्याने बनावट मृत्युपत्र लेख तयार करुन सदरची मालमत्ता नावावर झाल्यानंतर जास्त किंमतीमध्ये विकुन आरोपी राजेश जयस्वाल याचा वाटा जास्त असल्याने मालमत्तेचा मूळ लेख स्वतःचे ताब्यात ठेवुन घेतला. सदर आरोपी हा गुन्ह्यात अटक होण्यास टाळत असल्याने मा. न्यायालया कडुन सर्च वारंट प्राप्त करुन आरोपीचे रहाते घराची कायदेशीर रित्या झडती घेतली असता गुन्ह्यातील मूळ मृत्युपत्राच्या लेखाची छायांकित प्रत हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपी याने वर्धा शहरा मध्ये बऱ्याच मालमत्तेचे बनावट खरेदी खत व बनावट मृत्युपत्र तयार करुन लोकांची मालमत्ता हडप केल्याचे तपासात दिसुन आले आहे.

आरोपी राजेश जयस्वाल हा वर्धा शहरात अवैध दारु विक्री, जुगार, सट्टा, चेंगड अशा प्रकारचे अवैध व्यवसायातुन व गुंड प्रवृत्तिच्या लोकांना हाताशी धरुन वर्धा शहरातील लोकांच्या मालमत्तेचे बनावटी कागदपत्र तयार करुन व मालमत्ता खाली करुन घेवुन हडप करुन घेतो. त्यामुळे त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर व वर्धा शहर येथे बरेचशे गुन्हे नोंद आहेत.

आरोपी राजेश जयस्वाल याने गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविणे करीता मा. सत्र न्यायालय, वर्धा येथे बेल अॅप्लीकेशन दाखल केली असता मा. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपी याने मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे अटक पुर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न केले असता येथे सुद्धा त्याची जामीन अर्ज मा. न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी हा नमुद गुन्ह्यात पोलीसांचे अटके पासुन पळ काढत होता शेवटी नाईलाजाने आरोपीने मा. सत्र न्यायालयात वर्धा येथे दिनांक 23-08-2023 रोजी शरणागती पत्करली वरुन आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांनी आरोपी राजेश जयस्वाल यास अटक करुन मा. न्यायालयाकडुन आरोपीचा पी.सी.आर प्राप्त केला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, श्री. नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे, पो.उप.नि पवन भांबुरकर व स्टाफ पोहवा संतोष जयस्वाल, गजानन काळे, शैलेश भालशंकर, निकेश गुजर, कुनाल डांगे, स्वनिल भारव्दाज, आशिष महेशगौरी, प्रतिक नगराळे, मनापोशि ज्योत्स्ना रोकडे, चालक मनोज झाडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये