Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

वाचकांना मिळणार साहित्याचा मेवा – चंद्रपूर येथे तीन ग्रंथांच्या नव्या आवृत्यांचे होणार लोकार्पण

ना. सुधीर मुनगंटीवार करणार शकशर्ते शिवराय, राजा शंभूछत्रपती व सूर्यपुत्र ग्रंथांचे विमोचन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्राचे दैवत, तरुणांचे आदर्श व जागतिक अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तसेच धर्मरक्षक संभाजी महाराज व दानशूर कर्णाच्या कर्तुत्वाचा आढावा घेऊन सांप्रत इतिहास उलगडून दाखविणाऱ्या ग्रंथांचे लेखन धर्मभास्कर श्री सद्गुरूदास महाराज उपाख्य विजयरावजी देशमुख ह्यांनी केले असुन त्यांचे हे ग्रंथ वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांनी शब्दबध्द केलेल्या थोरल्या महाराजांच्या जीवनावरील शकशर्ते शिवराय या ग्रंथाच्या पाचव्या शिव‌आवृत्तीचे, धाकटे महाराज छत्रपती संभाजी राजांच्या कर्तुत्वाचा गुणगौरव करणाऱ्या राजा शंभूछत्रपती ग्रंथाच्या पाचव्या शिव‌आवृत्तीचे तसेच महाभारतातील उपेक्षित पण अत्यंत शुर, दानविर, मित्रप्रेमाचे प्रतिक असलेल्या महारथी कर्णावरील सूर्यपुत्र या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी फॉरेस्ट ॲकॅडमी, जिज्ञासा इमारत, सिद्धांत हॉल येथे दुपारी ठीक 1:00 वाजता सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, मत्स्य व्यवसाय आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शुभहस्ते होणार आहे तरी सर्व शिवभक्त नागरिकांनी तसेच साहित्यिक व साहित्य प्रेमींनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर व चंद्रपूर उपासना केंद्राने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये