ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व.हरीभाऊ डोहे विद्यालय कोरपना येथे गुरुजींचा ३० वा स्मृतिदीन व राजीव गांधी जयंती कार्यक्रम संपन्न

विद्यार्थ्यानां नोटबुक, पेन, कंपासचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दिनांक 20 ऑगस्ट रोजी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल गडचांदूर द्वारा संचालित स्वर्गीय हरीभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपणा येथे संस्थापक सचिव स्वर्गीय श्री.हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या ३० व्या पुण्यतिथि निमित्ताने आदरांजलि अर्पण कार्यक्रम २० ऑगस्ट 2023 ला आयोजित करन्यात आला. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल चे सचिव नामदेवराव बोबडे तर , विशेष अतिथि श्री विजयराव बावने साहेब संचालक चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैक चंद्रपुर, मुख्य अतिथि श्री विनायकराव उरकुड़े सहसचिव सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल, प्राध्यापक डॉ .सुनीलजी बिड़वाईक सर शरदराव पवार कला महाविद्यालय गडचांदूर, प्रमुख पाहुने मान. मनोहरराव चने बांधकाम सभापति नगर पंचायत कोरपना,मान. निसार शेख नगरसेवक नगर पंचायत कोरपना मान.मारोतराव रासेकर अध्यक्ष सेवा सहकारी संस्था कोरपना, मान. संजय ठावरी सर माजी प्राचार्य वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय कोरपना, उलमाले साहेब, तुलशीरामजी डोहे,विनोद कोल्हे,मुख्याध्यापक विनोद हेपट, सचिव हेमंत लोड़े, निरंजने, दोहारकर मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी व भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी, माता सरस्वती यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले,दीप प्रज्वलन करूण कार्यक्रम ची सुरूवात झाली, विद्यार्थीनि सुमधुर स्वागतगीताने स्वागत केले विद्यार्थीनि आपले मनोगत मांडली हेपट सर यानि प्रास्ताविक केले प्रगति चा आलेख मांडला,प्राचार्य ठावरी सर, बीडवाइक सर यानी ही अपने मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी विजयराव बावने यांनि आपल्या मनोगतातुन स्वर्गीय हरीभाऊ डोहे गुरुजी हे अष्टपैलु व्यक्ति होते, त्यांनि दुर्गम भागात शिक्षणाची गंगा आनली व गरीब मुलाना शिक्षण उपलब्ध करून दिले.

शिक्षण, समाजकारण व राजकारण यांचा उत्तम उदाहरण गुरूजी आहे असे मत मांडले, अध्यक्षिय भाषनातून नामदेवराव बोबडे सर यानी संपूर्ण सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल आजचा प्रगतिचा आलेख मांडला व स्वर्गीय हरीभाऊ डोहे विद्यालय कोरपना ची स्थापना, विकास लवकरच संस्थेकडून नवीन इमारत निर्माण करूण देन्याचा संकल्प बोलुन दाखविला. उपस्थितानि त्यांचे अभिनंदन केले. संचालन गोरे मैडम यांनि तर आभार दिनकर सोनटक्के सर यानि मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी, पालक व शिक्षक निमंत्रित पाहुणे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सोनटक्के सर, मडावी सर, पुपुलवार सर, कोरवते यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यानां नोटबुक, पेन, कंपासचे वाटप केले गेले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये