Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भागवत सप्ताह मध्ये अनेक नागरिकांनी व्यसन सोडण्याची घेतली शपथ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथिल बालाजी सभागृहात भव्य श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.समारोपीय कार्यक्रम काल्याचे किर्तनाने झाला या वेळी अनेक नागरिकांनी संत श्री मनीष महाराज, मधुकर महाराज खोडे, रामेश्वर महाराज खोडे,दिपक महाराज पुरी व इतर संत मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत दारू,गुटखा, तंबाखू,मांसाहार, यासारखे व्यसन सोडण्याचा निर्धार करून शपथ घेतली, या नागरिकाच्या निर्णयाचे रामेश्वर महाराज खोडे ,व मधुकर महाराजांनी त्यांचे पाय धुवून व पुष्पहार टाकून स्वागत केले व भागवत कथेची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले, व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी संतांचे अमूल्य योगदान लाभले
संपूर्ण जगात मानव जीवनाच्या कल्याणासाठी भागवत कथेचा अमृत प्रवाह अनेक वर्षांपासून सुरू आहे, सर्वांना उत्कृष्ट जीवनशैली सोबत धर्म, लाभ, सामाजिक संस्कार आणि आध्यात्मिक उत्थानासह समाजाला सर्वोत्कृष्ट दिशा दाखविण्यासाठी भागवताचार्य संत श्री मनीष भाईजी महाराज यांच्या अमृत वाणीने श्री पांडुरंग महाराज पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीतमय कथा सादर करण्यात आली, पहिल्या दिवशी परिसरातील महिला भजन मंडळांनी शोभायात्रा काढून पवित्र ज्ञान यज्ञाची सुरुवात केली,सात दिवस चाललेल्या या भागवत कथेच्या प्रसंगी विविध सामाजिक, अध्यात्मिक,धार्मिक,राष्ट्रीय विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले,दररोज झाकी च्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण राधा, शुकदेवजी प्रगट्य,कपिल अवतार, विठ्ठल रुख्मिनी, नारद अवतार, वराह अवतार,नृसिंह अवतार, माँखनचोर लीला, गोवर्धन पूजा, अन्नकुट उत्सव, वामन अवतार, श्रीराम जन्मोत्सव, श्रीकृष्ण जन्मोत्सव, महारास उत्सव, श्रीकृष्ण रुख्मिणी मंगल विवाह उत्सव,सुदाम चरित्र इत्यादी कथा सादरीकरण झाले.
या दरम्यान भागवत सेवा समिती व विठ्ठल रुख्मिणी देवस्थान च्या वतीने वृक्षारोपण तसेच ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला महायज्ञ हवन पूर्णाहुती, काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वितरण करून समाप्ती करण्यात आली
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ह भ प श्री मनीष महाराज व ह भ प श्री दिपक महाराज पुरी यांचे मार्गदर्शनाखाली सतीश उपलेंचवार,अशोक एकरे,उद्धव पुरी,हंसराज चौधरी, बंडूजी पिदूरकर,हिम्मत ढोके, सुभाष बरुतकर, संजय मेंढी,विनोद पिदूरकर,विष्णू भागवत,बालाजी पुरी,अंबादास घोटकर,विठ्ठलराव मुसळे, प्रशांत पोतनूरवार, सुधीर कोटावर,राधेश्याम जोशी,श्रीकृष्णमूर्ती चिंतावार, मेघराज एकरे, विठ्ठल पुरी यांचेसह महिला पुरुषांनी अथक परिश्रम घेतले,कार्यक्रमाला राजुरा,कोरपना, जिवती तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
कार्यक्रमाचे संचालन उद्धव पुरी यांनी केले तर सर्वांचे आभार सतीश उपलेंचवार यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये