प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, चंद्रपूर यांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, चंद्रपूर यांच्या वतीने बुधवारी, 24 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणात संघाचे केंद्रीय सरकार्यवाह श्री. संजय बोधे, जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्रजी मोटघरे, कार्याध्यक्ष श्री. प्रीतमजी सोनारकर, चिमूर तालुका अध्यक्ष श्री. अरुण गायकवाड, वरोरा तालुका सचिव श्री. मनोज वनकर, वरोरा तालुका अध्यक्ष श्री. वाशिष्ठ पेटकर, श्री. गुलाबजी बागेसर, श्री. दिवाकर डबले, श्री. नयन देशकर, श्री. कृपलानी शेंडे, श्री. भट्टलवार, डॉ. रंगश्यामजी मोडक, श्री. अमर गोले टकर, श्री. जालदर लांडे, श्री. प्रमोदजी सोरते, श्री. विलासजी रामटेके, श्री. प्रांजल रामाजी बेलखुडे, श्रीमती नीता रामाजी बेलखुडे आणि श्री. दिगांबर दुर्योधन यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या उपोषणादरम्यान संघाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजेशजी पातळे यांच्यासमोर मांडल्या. श्री. पातळे यांनी सर्व मागण्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संघाने आमरण उपोषण यशस्वीपणे संपवले. प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाने आपल्या मागण्यांसाठी दाखवलेल्या एकजुटीचे आणि प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक होत आहे.