Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

23 नेत्रदान, 8 अवयवदान आणि 2 देहदानाचे संकल्प

नि:शुल्क आरोग्य शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर:- सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहीजे या संकल्पनेतून आनंद नगर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. नेहाताई दि. मळीवार यांच्या नेतृत्वात आनंदनगर महीला मंडळातर्फे दि. शुक्रवार ला सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत जेष्ठ नागरिक संघ रामनगर चंद्रपूर येथे नि:शुल्क अवयवदान, नेत्रदान संकल्प व ब्लड प्रेशर (B P)आणि शुगर तपासणी आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये नामवंत डॉक्टरांची चमू बोलविण्यात आली होती. नेत्रदान, अवयवदान का केले पाहीजे याबद्दल तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिला अग्रेसर होत्या.

कार्यक़्रमाचे प्रस्ताविक सौ. जयश्री शाह यानी केले, संचालन सौ. नेहा मळीवार तर आभार प्रदर्शन सौ. सपना नगवानी यांनी केले. मनीषा रेड्डी, माया देवगड़े,उषा ढवळ,शीतल पत्तिवार, स्वाती हनमंते,कुसुम निखाड़े,मंगला बुरान,सूकेशनी शेंडे,संचिता गुज्जनवार,भारती विट्टलवार,रेखा देवगड़े , सविता कुट्टी,कल्पना राजूरकर,सुधाताई भगत,अश्विनी उरकूडे, मनीषा गोरख, पुरस्वनि शीतल सिद्ममशेटिवार आदीं महिलांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग होता.

या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे हा कार्यक्रम महिला मंडळानी भीसी ग्रूप संस्कार कलशच्या आर्थिक बचतीच्या माध्यमातुन केला. शिवाय कॅन्सर (कर्करोग) ग्रस्त रोग्यांना आर्थिक स्वरुपात भेट देण्यात आली. आम्ही या समाजाचे ॠणी आहोत या भावनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. 23 नेत्रदान, 8 अवयवदान आणि 2 देहदानाचे फार्म भरून घेन्यात आले.

      “ज़िंदगी के साथ भी,ज़िंदगी के बाद भी”

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून अशाप्रकारे लोकोपयोगी कार्यक्रम व शिबिरे या मंडळाकडून घेत राहू अशी ग्वाही मंडळाच्या अध्यक्षा सौ.नेहाताई मळीवार यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये