Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्काऊट गाईड चळवळीतून सर्वांगीण विकास होतो – डॉ. मंगेश घोगरे

स्काऊट गाईड शिक्षकांची उदबोधन कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा: ‘नवीन अभ्यासक्रमात खेळातून शिक्षण देणे अपेक्षित असून या दृष्टिकोनातून भारत स्काऊट व गाईडच्या प्रशिक्षणातून मुलांमुलींना तत्पर, शिस्तबद्ध, कौशल्य संपन्न, देशप्रेमी व साहसी बनविले जाते. म्हणजेच स्काऊट गाईड चळवळीतून विकास होतो, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनी एक दिवसीय उद् बोधन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ९ सप्टेंबर रोजी स्थानिक स्काऊट गाईडच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात शिक्षकांसोबत संवाद साधताना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मंगेश घोगरे तर प्रमुख अतिथी म्हणून स्काऊट गाईडच्या जिल्हा मुख्यआयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नीतू गावंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा आयुक्त (गाईड) मनीषा भडंग, विस्तार अधिकारी अर्चना पोरेडडीवार, विस्तार अधिकारी जया परमार, रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे, गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली अवथळे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले, उर्मिला चौधरी व माजी जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे मंचावर उपस्थित होते.

वर्धा जिल्हा भारत स्काऊट गाईडच्या वतीने सेलू, देवळी व वर्धा तालुक्यातील स्काऊट शिक्षक व गाईड शिक्षकांकरिता एक दिवसीय उदबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात १५५ शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. सदर कार्यशाळेत स्काऊट गाईड चळवळीची माहिती, नोंदणी प्रक्रिया, वर्षभर राबवली जाणारी उपक्रम व अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. नीतू गावंडे म्हणाल्या स्काऊट गाईड ही नैतिक मूल्य रुजवणारी चळवळ असून बालपणापासूनच मुलामुलींच्या मनावर चांगली संस्कार रुजवली जाऊ शकतात तर शिक्षणाधिकारी मनीषा भडंग म्हणाल्या विद्यार्थ्यांना आगळेवेगळे प्रशिक्षण व कृतीतून अध्यापन करणारे स्काऊट गाईडचे प्रशिक्षण आहे. म्हणून शिक्षकांनी सदर प्रशिक्षण पूर्ण करून आपली शाळा कृतिशील बनवली पाहिजे.

याप्रसंगी रोहर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, स्काऊटचे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले व सहाय्यक जिल्हा आयुक्त राजहंस जंगले यांना स्काऊट व गाईड चळवळीतील प्रदीर्घ सेवेबद्दल गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जानेवारी 2024 मध्ये संपन्न झालेल्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणारे रोव्हर लीडर प्रा. रवींद्र गुजरकर, रोव्हर लीडर संतोष तुरक, उप मुख्याध्यापक तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त सुरेंद्र उमाटे, सहचिटणीस अभिजीत पारगावकर, दीपक गुढेकर, याकुब शेख, अमोल मानकर, प्रशिक्षण आयुक्त उर्मिला चौधरी, संगीता पेठे, रूपा कडू व निर्मला नंदुरकर यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक भाषण स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा व स्काऊटच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन रेंजर कोमल शितळे चितळे हिने तर आभार गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली अवथळे यांनी मानले.

यशस्वीतेकरिता हेमलता वाढीवे, प्रियंका ठोसर, सुषमा कार्लेकर, रोव्हर तेजस धोटे नयन तुमसरे, श्रुतिका गुढे, नेहा घोडे, साक्षी पारिसे, कुणाल सातपुते व व्हिकी पेंदुरकर यांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये