Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“दुधाच्या कॅनमधुन दारूची वाहतुक करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        दि 09/09/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन देवळी परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे देवळी येथे कळंब ते वर्धा महामार्गावर सापळा रचुन एका काळ्या रंगाच्या Hero Honda Glamour मोटर सायकल क्र. MH-32/L-3763 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, यातील आरोपी प्रशांत रामेश्वर कोंबे, वय 42 वर्ष, रा. साठोडा, तह. जि. वर्धा, हा सदर मोटर सायकलचे दोन्ही बाजुला दुध वाटपाकरीता वापरण्यात येणा-या कॅनमध्ये विदेशी दारूचा माल बाळगुन त्याची अवैधरित्या विक्री करीता वाहतुक करतांना मिळुन आला असुन, सदर दारूचा माल त्याने कळंब जि. यवतमाळ येथील बस स्टॉपजवळील मनीष जैयस्वाल यांचे एम.पी. वाईन शॉप मधुन अवैधरित्या खरेदी केल्याचे सांगितल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपी प्रषांत कोंबे याचे ताब्यातुन 1) एक काळ्या रंगाची Hero Honda Glamour मोटर सायकल क्र. MH-32/L-3763 किं. 80,000 रू. 2) विदेशी दारूने भरलेल्या 375 एम.एल.च्या 24 सिलबंद शिशा कि 16,800 रू 3) विदेशी दारूने भरलेले 02 लीटरचे 07 सिलबंद बंम्फर कि. 24,500 रू 4) दुध वाटपाकरीता वापरण्यात येणारे दोन जर्मनी कॅन कि. 8,000 रू असा जु.किं. 1,29,300 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी नामे 1) प्रशांत रामेश्वर कोंबे, वय 42 वर्ष, रा. साठोडा, तह. जि. वर्धा, 2) कळंब जि. यवतमाळ येथील मनीष जैयस्वाल यांचे एम.पी. वाईन शॉप चा चालक/मालक यांचेवर पोलीस स्टेशन देवळी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. अमोल लगड, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये