सिनगाव जहांगीर येथे महाराजस्व शिबिर पार पडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिनगाव जहागीर येथे येथे महसूल मंडळाचे तिसरे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान महाराजस्व शिबिर 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले, सदर शिबिराच्या अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार सायली जाधव, होत्या मार्गदर्शक म्हणून मंडळ अधिकारी श्री विजय हिरवे उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये सरपंच सौ सुनीता डोईफोडे,शालिग्राम डोईफोडे विविध सोसायटीचे अध्यक्ष,तसेच प्रमोद नागरे ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते ,सदर शिबिरास मंडळातील 150 शेतकरी उपस्थित होते,शिबिरामध्ये सर्व ग्राम महसूल अधिकारी श्री डोईफोडे ,श्री उदार ,श्री हांडे , श्री खरात आपापले इन्स्टॉल घेऊन उपस्थित होते ,सदर शिबिरामध्ये विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच व्यासपीठावरून माननीय नायब तहसीलदार यांनी शिबिराचे महत्त्व,शासनाची भावना विशद केली तर मंडळ अधिकारी विजय हिरवे यांनी शिबिरात चालणाऱ्या कृतींची व विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
सदर शिबिरामध्ये अनेक विषयांबाबत चर्चा झाली विशेषतः शेतकऱ्यांचे शेत रस्त्यांबाबत माहिती घेण्यात येऊन त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या